अंनिसतर्फे उपक्रम : फोटोच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : महाराष्ट्र अंनिस जिल्हा शाखा गडचिरोलीच्या साथी म्युझिकल ग्रुपच्या वतीने जिल्हा कारागृह (इंदाळा) गडचिरोली येथे कैद्यांसाठी ‘ऐ मेरे प्यारे वतन’ हा देशभक्तीपर गीतगायनाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृहाचे प्रभारी तुरूंग अधिकारी बी.सी. निमगडे तर प्रमुख अतिथी जिल्हा पोलीस मुख्यालय येथील पीएसआय जयसिंग राजपूत, अवधूत श्रृंगारे, महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, पित्तुलवार उपस्थित होते. सदर कार्यक्रमात स्थानिक गायक कलाकार अरुण पोगळे, विजया पोगळे, अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव पुरुषोत्तम ठाकरे व सजल अंजनकर यांनी देशभक्ती गीतांसोबतच, भावगीते, सुमधूर हिंदी- मराठीतील गाजलेली गीते सादर केली. कारागृह अधीक्षक निमगडे यांना कारागृहात यापुर्वी संघटणेद्वारे घेतलेल्या काही उपक्रमांचे फोटो व पुस्तक भेट स्वरुपात देत्यात आले. यावेळी अंनिस गडचिरोली तालुका शाखेचे उपाध्यक्ष दामोधर उप्परवार, जिल्हा अंनिस कार्यकारिणीचे पदाधिकारी देवानंद कामडी, सुचिता कामडी, ग्रिष्मा मून आदी उपस्थित होते. संचालन अंनिसचे जिल्हा संघटक विवेक मून यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा कारागृहाचे रक्षक पांडुरंग शिराडे यांनी मानले.
कारागृहात रंगली गीतांची मैफिल
By admin | Published: June 26, 2017 1:10 AM