लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कुरखेडा तालुक्याच्या चिनेगाव (पळसगाव) गट ग्रामपंचायतीच्या ८ जुलै २०१६ ग्रामसभेत अनुसूचित जमातीच्या बीपीएल लाभार्थ्यांची शासकीय घरकुलाच्या लाभाकरिता यादी तयार करण्यात आली. मात्र ग्रामसभेत या यादीतील पात्र लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम बदलवून गरजू कुटुंबाला शासकीय घरकुलापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करीत याबाबतची तक्रार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे करण्यात आली आहे.चिनेगाव येथील बाळकृष्ण तिम्मा जुमनाके व ज्ञानेश्वर रामा जुमनाके या पात्र लाभार्थ्यांचे नाव ग्रामसभेत आले होते. त्यानुसार लाभार्थ्यांची मंजूर यादी तयार झाली. मात्र यादीतील अनुक्रमानुसार सुरूवातीचे नाव डावलून नंतरचे नाव ग्रामसभेत घेण्यात आले, असा आरोप बाळकृष्ण जुमनाके व ज्ञानेश्वर जुमनाके यांनी केला आहे. आपल्याला नियमानुसार घरकूल देण्याची मागणी केली आहे. याबाबत चिनेगावचे ग्रामसेवक व्ही. एम. पत्रे यांना विचारणा केली असता, ज्या एसटी बीपीएल लाभार्थ्यांना यापूर्वी घरकुलाचा लाभ मिळाला नाही, त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. ज्यांना २५ वर्षांपूर्वी घरकुलाचा लाभ घेतला. त्यांचा प्राधान्य यादीतील नाव मागे समाविष्ट करण्यात आले आहे. हा शासकीय नियम तेव्हा मंजूर यादीतील प्राधान्यक्रम डावलून पात्र लाभार्थ्यांना शासकीय घरकुलापासून वंचित ठेवण्याचा उद्देश नाही. या कुटुंबांनाही योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ मिळेल, असे ग्रामसेवक पत्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
पात्र होऊनही घरकूल मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:12 AM
कुरखेडा तालुक्याच्या चिनेगाव (पळसगाव) गट ग्रामपंचायतीच्या ८ जुलै २०१६ ग्रामसभेत अनुसूचित जमातीच्या बीपीएल लाभार्थ्यांची शासकीय घरकुलाच्या लाभाकरिता यादी तयार करण्यात आली.
ठळक मुद्देसीईओंकडे तक्रार : ग्रामसभेने मंजूर यादीचा प्राधान्यक्रम डावलला