लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर पालिकेच्या विविध योजनेअंतर्गत निविदा भरून शहरातील विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा ठेव रक्कम परत करावी लागते. शहरातील १५ कंत्राटदारांचे जवळपास १५ लाख रूपयांची या पोटीची रक्कम पालिकेकडे प्रलंबित आहे. सदर रक्कम संबंधित कंत्राटदाराला देण्यासाठीची कार्यवाही गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे कंत्राटदारांना लवकरच सुरक्षा ठेव रक्कम मिळणार आहे.नगर पालिकेअंतर्गत नगरोत्थान, दलित वस्ती, वैशिष्ठ्यपूर्ण व इतर योजनांमधून दरवर्षी शहराच्या विविध वॉर्डात नाली, रस्ते, छोटे पूल व इतर बांधकामे केली जातात. ती कामे खासगी नोंदणीकृत कंत्राटदारामार्फत मार्गी लावली जातात. सदर कामे घेणाºया संबंधित कंत्राटदारांना अनामत व सुरक्षा ठेव रक्कम अदा करावी लागते. कामाची निविदा भरताना एक टक्के अनामत रक्कम, वर्कआदेश देण्यापूर्वी दोन टक्के रक्कम अदा करावी लागते. काम पूर्ण झाल्यानंतर पालिकेतर्फे कंत्राटदारांना द्यावयाच्या कामाच्या एकूण बिलातून सात टक्के रक्कम कपात केली जाते. अशाप्रकारे संबंधित कंत्राटदारांची कामाच्या एकूण किमतीपैकी १० टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून पालिकेकडे जमा असते. काम पूर्ण झाल्यानंतर प्रदान प्रमाणक प्रपत्र घेऊन ही रक्कम संबंधित कंत्राटदाराला परत करावी लागते.सन २०१३ पासून गडचिरोली पालिकेअंतर्गत शहरात काम करणाºया १५ कंत्राटदारांचे सुरक्षा ठेवपोटीजवळपास पाच लाख रूपये न.प.कडे प्रलंबित आहेत. ही रक्कम संबंधित कंत्राटदाराला अदा करण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत कंत्राटदाराकडून प्रदान प्रमाणक प्रपत्र भरून घेतले जात आहे.कामाचे आॅडिट नोट तपासून पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे पाच वर्षांपासून प्रलंबित असलेली सुरक्षा ठेव पोटीची रक्कम शहरातील कंत्राटदारांना मिळणार आहे. तशी मागणीही कंत्राटदारांनी केली होती.न.प.अंतर्गत शहरात विकास कामे करणाºया काही कंत्राटदारांनी ईपीएफची रक्कम पालिकेकडे भरली नव्हती. काही कंत्राटदारांच्या आॅडिट झाले नव्हते. त्यामुळे कंत्राटदारांची सुरक्षा ठेव रक्कम प्रलंबित राहिली. आपण पालिकेचे मुख्याधिकारी पद स्वीकारल्यानंतर याची माहिती घेतली. आता संबंधित कंत्राटदाराकडून प्रदान प्रमाणक प्रपत्र भरून घेतले जात असून पुढील कार्यवाही सुरू आहे. कंत्राटदारांना येत्या काही दिवसात रक्कम मिळेल.- संजीव ओहोड, मुख्याधिकारी,नगर परिषद, गडचिरोली
सुरक्षा ठेव रक्कम मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 1:28 AM
नगर पालिकेच्या विविध योजनेअंतर्गत निविदा भरून शहरातील विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा ठेव रक्कम परत करावी लागते. शहरातील १५ कंत्राटदारांचे जवळपास १५ लाख रूपयांची या पोटीची रक्कम पालिकेकडे प्रलंबित आहे.
ठळक मुद्देपालिकेतर्फे कार्यवाही सुरू : १५ कंत्राटदारांची पाच लाखांवर रक्कम प्रलंबित