पावसाळ्यात आता डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धाेका आहे. साेबतच आता काेराेनाचीही साथ सुरू आहे. काेराेना व डेंग्यू राेगाची लक्षणे सारखीच असल्याने रुग्ण गाफील राहण्याची शक्यता आहे. दाेन्ही राेगांचा वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णाची स्थिती गंभीर हाेण्याचा धाेका राहताे. त्यामुळे वेळीच चाचणी करून घेऊन त्यानुसार उपचार सुरू करणे आवश्यक आहे.
बाॅक्स
चाचणी कुठली
काेराेनासाठी- आरटीपीसीआर, अँटिजेन
डेंग्युसाठी- एलआयझा, एनएस-१
बाॅक्स
अंगदुखी, डाेकेदुखी, ताप
-काेराेना व डेंग्यू या दाेन्ही आजारांमध्ये अंगदुखी, सांधेदुखी, डाेकेदुखी, ताप ही लक्षणे आढळून येतात. यामुळे रुग्णाला संभ्रम निर्माण हाेण्याची शक्यता राहते. त्यामुळे वेळीच तपासणी हाेणे आवश्यक आहे.
- डेंग्यू रुग्णाचा रक्तजल नमुना घेऊन ताे तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविला जाते.
बाॅक्स
पाणी उखळून प्या, मच्छरदाणीचा वापर करा
-डेंग्यू हा राेग डासांमुळे पसरते. त्यामुळे झाेपतेवेळी मच्छरदाणीचा वापर करावा. डेंग्यूच्या डासाची पैदास स्वच्छ पाण्यात हाेते. त्यामुळे जवळपासच्या जलसाठ्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
- पावसाळ्यात पाणी उखळूनच प्यावे.
बाॅक्स
वर्षनिहाय डेंग्यूचे रुग्ण
वर्ष रुग्ण
२०१८-१३
२०१९- १०
२०२०-१६
२०२१-१