शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

प्रेमात धोका, प्रियकराकडून शिवीगाळ अन् मारहाणही; त्रास असह्य झाल्याने 'तिने' उचलले टोकाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 12:28 PM

दोन महिन्यांपूर्वीच्या चिठ्ठीवरून झाला उलगडा, प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल

चामोर्शी (गडचिरोली) : त्यांचे एकमेकावर प्रेम जुळले. लग्नाच्या आणाभाकाही झाल्या. पण त्याने काही दिवसातच तिला टाळणे सुरू केले. एवढेच नाही तर शिवीगाळ करून मारहाणही केली. यामुळे प्रेमभंगाच्या दु:खात त्या युवतीने गळफास लावून घेतला. गेल्या १० ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पण घरात दोन महिन्यांपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आणि युवतीच्या आत्महत्येचे खरे कारण पुढे आले. अखेर पोलिसांनी प्रियकरावर मृत्यूला कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणातील युवती ही चामोर्शीच्या गणेश नगरातील तर प्रियकर घोट येथील रहिवासी आहे. त्याचे नाव सौरभ अधिकारी असे आहे. संबंधित युवती दोन-तीन वर्षांपासून नागपूर येथे शिक्षण घेत असताना विद्या बजाज कंपनीमध्ये पार्टटाईम जॉब करत होती. तिला नीट परीक्षेची तयारी करायची असल्यामुळे जून २०२२मध्ये ती चामोर्शी येथील घरी आली होती. १७ जुलै रोजी तिने ‘नीट’ची परीक्षा दिली. पण ती नागपूरवरून आल्यापासून तणावात असल्याचे दिसून येत होते. आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने आपल्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितले. पण सौरभ आता लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याने तणावात असल्याचे सांगितले.

दरम्यान, २ ऑगस्ट रोजी राहत्या घरी तिने गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अखेर उपचारादरम्यान गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात १० ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात मुलीच्या आईने गडचिरोली पोलीस ठाण्यात तोंडी माहिती दिली.

- अन् चिठ्ठीने मिळाला पुरावा

१९ ऑगस्ट रोजी सायंकाळी युवतीच्या आईला घरातील बेडरूममध्ये साफसफाई करताना गादीखाली एक चिठ्ठी सापडली. १४ जून रोजी लिहिलेल्या त्या चिठ्ठीमध्ये हिंदी, बंगाली भाषेचे लिखाण केले होेते. त्यात सौरभ अधिकारी यांनी खूप मानसिक त्रास दिला असून, प्रेमसंबंध असताना शिवीगाळ करून धमकी देऊन मारहाण केली आहे. तो माझ्याशी लग्न करणार नसल्यामुळे मला जीवन जगणे असह्य झाले आहे, असा मजकूर होता. युवतीच्या आईने ही चिठ्ठी पोलिसात दिल्यानंतर आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या सौरभ अधिकारीविरूद्ध भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgadchiroli-acगडचिरोली