गडचिरोली : बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल २७ मे रोजी संकेतस्थळावर दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला. जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.६७ टक्के इतका लागला असून यंदा गतवर्षीच्या तुलनेत टक्का वाढूनही नागपूर विभागात मात्र चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये दहावीची परीक्षा घेतली होती. जिल्ह्यातून १४३०५ विद्यार्थी (मुले ७ हजार ३९७ व मुली ६ हजार ९०८) प्रविष्ठ होते. यापैकी प्रत्यक्षात ७ हजार २०४८ मुले व ६ हजार ७७७ मुली अशा एकूण १४ हजार २५ जणांनी परीक्षा दिली होती. यातील १३ हजार २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ७३३ मुले व ६ हजार ५४५ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचा टक्का ९२.८९ तर मुलींचा ९६.५७ इतका आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल सरासरी ९२.५२ टक्के इतका होता. टक्का कमी असतानाही गडचिरोली जिल्ह्याने विभागात तृतीय स्थान पटकावले होते. यंदा जिल्ह्याने सरासरी ९४.६७ टक्के गुण मिळवूनही विभागात चौथ्या स्थानी घसरण झाली.
वर्षनिहाय निकाल२०२२ ९५.६२२०२३ ९२.५२२०२४ ९४.६७
किती पास, किती नापास ?यंदा१४०२५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी १३२७८ जण उत्तीर्ण झाले तर ७४७ जण अनुत्तीर्ण झाले. त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल.
नागपूर विभागात कामगिरी अशी...जिल्हा प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी एकूण उत्तीर्ण टक्केवारीगोंदिया ६९७६ ३४७४ १७४५५ ९६.११भंडारा ६१२९ ३९९१ १५२३८ ९५.४१नागपूर १९८५३ १५३२२ ५५७९८ ९५.१७गडचिरोली ६१५९ ३५२२ १३२२८ ९४.६७गोंदिया ७९७६ ३४७४ १७४५५ ९६.११वर्धा ५१५० ४५५० १४४६० ९२.०२
२५६ पैकी १८१ रिपीटर उत्तीर्णदहावीत अनुत्तीर्ण झालेल्या २६० जणांनी पुन्हा परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी २५६ जणांनी परीक्षा दिली. यातील १८१ जण उत्तीर्ण झाले. याचा एकूण टक्का ७०.७० इतका आहे. नागपूर विभागात रिपीटरच्या उत्तीर्णतेत गडचिरोली जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.