प्रदेश उपाध्यक्ष करा : अजित पवार, तटकरेंना जि. प. अध्यक्ष भेटलेगडचिरोली : माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम पक्ष स्थापनेपासून शरदचंद्र पवार यांच्या सोबत आहेत. त्यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदावर काम करण्याची पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम तुकाराम कुत्तरमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे.कुत्तरमारे यांनी मुंबई येथे अजित पवार व सुनील तटकरे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. कुत्तरमारे यांनी म्हटले आहे की, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य सुरू आहे. पक्ष स्थापनेपासून शरद पवार व सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली १५ वर्षांपासून जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांपैकी ४ पंचायत पंचायती समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत दोन नगर पंचायती गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी दोनवेळा पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदही सांभाळले असून आगामी नगर पालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लखात घेऊन त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावावी, अशी मागणी कुत्तरमारे यांनी या दोन्ही नेत्यांकडे केली.यावेळी या दोन्ही नेत्यांनी कुत्तरमारे यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबीही जाणून घेतल्या.
धर्मरावबाबा आत्राम यांना संधी द्या
By admin | Published: September 15, 2016 1:57 AM