लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकºयांची जमीन जात आहे, अशा शेतकºयांना तसेच ज्या नागरिकांचे घरे जात आहेत, अशा नागरिकांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी रेल्वेग्रस्तांनी केली आहे.गडचिरोली-देसाईगंज रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेस्थानकाचे बांधकाम गडचिरोली शहरातील एसटी डेपोच्या अगदी मागच्या बाजूला होणार आहे. या परिसरात अरूणा प्रदीप तेलसे व देवराव नक्टू चौधरी यांची पक्की घरे आहेत. तर पत्रू डोनूजी रोहणकर, राजू वकरे, भास्कर निंबेकर यांच्या घराचे अर्धवट बांधकाम झाले आहे. त्याचबरोबर लक्ष्मीकांत मेश्राम, श्रीराम कांबळे, रवींद्र बाळेकरमकर, पुरूषोत्तम गेडाम, वच्छला गेडाम, भीमराव वासनिक, पुरूषोत्तम ढेंगळे, देवेंद्र कोकोडे, राजेश सूर्यवंशी, डी. यू. गोरे, सी. यू. कोहपरे, वैशाली चन्नावार, अर्चना पिटवार आदींची घरांची जागा आहे. रेल्वे विभागाने सर्वेक्षण करण्यापूर्वी येथील नागरिकांना नोटीस सुद्धा पाठविली नाही. सर्वे करून एकाचवेळी या भागात खांब गाडण्यात आले. सदर जागा घरांच्या बांधकामाची असल्याने प्रत्येक प्लॉटची किंमत १० लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे त्यानुसार मोबदला देण्यात यावा, प्रत्येक जमीनधारकाला नोकरी देण्यात यावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.आयुष्याची जमापूंजी खर्च करून अनेकांनी प्लॉट खरेदी केले आहे. मात्र सदर प्लॉट आता रेल्वेमार्गासाठी जाणार आहेत. तेवढा मोबदला मिळला नाही तर अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.प्रकल्पग्रस्त एकवटणारजमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. यासाठी रेल्वे प्रकल्पग्रस्त समितीचे गठन केले जाणार आहे. या माध्यमातून लढा दिला जाणार आहे.
रेल्वेग्रस्तांना योेग्य मोबदला द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 1:28 AM
देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकºयांची जमीन जात आहे, अशा शेतकºयांना तसेच ज्या नागरिकांचे घरे जात आहेत, ....
ठळक मुद्देप्लॉटच्या जागेवर रेल्वे लाईन : नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण