लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गॅस व शिधापत्रिकेसाठी (कार्ड) जे लाभार्थी पात्र आहेत, या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत १५ आॅगस्टपर्यंत शिधापत्रिका व एजपीजी गॅसचे वाटप करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.१५ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत पात्र सर्व लाभार्थ्यांना गॅस व शिधापत्रिकेचे वितरण करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान राबविला जाता आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात करण्यात आला आहे. यानिमित्त नियोजन भवनातील सभागृहात शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.कृष्णा गजबे आदी मान्यवर उपस्थित होते.शासनाच्या निर्देशानुसार या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शिधापत्रिका व गॅस जोडणी द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी केले.कार्यक्रमाला तहसीलदार, लाभार्थी, रास्त भाव दुकानदार, गॅस एजन्सीचे वितरण अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.६५ हजार कुटुंबांना गॅस जोडणीची प्रतीक्षागडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेच्या ९१ हजार ८५०, प्राधान्य कुटुंब योजनेच्या १ लाख ३ हजार ३९० शिधापत्रिका अस्तित्वात आहेत. तसेच १ लाख ५४ हजार ३९ एलपीजी गॅसधारक आहेत. अजूनही ६५ हजार ३९ कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली नाही. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटपाची कार्यवाही एका महिन्याच्या आत करावी लागणार आहे. लाभापासून वंचित राहिलेले बहुतांश लाभार्थी हे दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आहेत. यातील बहुतांश आदिवासी कुटुंब गॅसचा लाभ घेण्यास तयार होत नाही. तरीही त्यांना गॅस देणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे. यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे.
एक महिन्यात गॅस व कार्ड द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:10 PM
गॅस व शिधापत्रिकेसाठी (कार्ड) जे लाभार्थी पात्र आहेत, या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत १५ आॅगस्टपर्यंत शिधापत्रिका व एजपीजी गॅसचे वाटप करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ