गडचिराेली तालुक्यात मागील वर्षीपासून नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला आहे. वाघाने आतापर्यंत १२ लाेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांसाठी शेतावर कसे जायचे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. वन्य जीवांचे संरक्षण करणे वनविभागाची जबाबदारी असली तरी वाघांपासून मानवाला धाेका निर्माण हाेत असेल तर त्यांची काळजी घेणे हे सुद्धा वन विभागाचे कर्तव्य आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा बळी वाघाने घेतल्यानंतर त्या कुटुंबाची काय अवस्था हाेते हे त्याच कुटुंबाला माहीत आहे. आर्थिक मदत देऊन ही भरपाई शक्य नाही. यापुढे कुणाचा बळी जाऊ नये यासाठी वाघाला लवकर जेरबंद करावे. तसेच पीडितांना आर्थिक मदतीसह एका सदस्याला शासकीय नाेकरी द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राज बन्साेड यांनी केली आहे. यावेळी मिलिंद बांबाेळे, महेश टिपले, पुरुषाेत्तम रामटेके, विजय देवतळे, जितेंद्र बांबाेळे, प्रितेश अंबादे, प्रतीक डांगे, मून रायपुरे उपस्थित हाेते.
वाघपीडित कुटुंबातील एकास नाेकरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:44 AM