लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १९७२ पासून हंगामी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांना ६० वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले आहे. त्या कामगारांना शासनाच्या धोरणाप्रमाणे किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाने केली आहे. यासाठी २६ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात ६० वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांच्या जागेवर त्यांच्या एका पाल्याला फवारणी कामगार म्हणून घेतले आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यात कामगारांच्या पाल्यांना देण्यात आले नाही, असा आरोप संघटनेने केला आहे. कामगारांच्या पाल्यांना कामावर घ्यावे, यासाठी २७ मे २०१३ रोजी आरोग्य सेवा सहसंचालक पुणे यांना विनंती केली होती. ती विनंती त्यांनी मान्य केली आहे. मात्र आदेशाचे पालन करण्यात आले नाही. कामगारांच्या पाल्यांना कामावर न घेता आडमार्गाने चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यातील कामगारांना फवारणी कामगार म्हणून घेण्यात आले आहे.फवारणी कामगारांवरील अन्याय दूर करावा, या मागणीसाठी जिल्हाभरातील जवळपास ४०० कामगारांनी कामबंद करून उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमत शेख यांनी दिला आहे.आंदोलनात भाऊजी किरमे, बंडू मुलकावार, माधव दुर्गे, विजय गोरेड्डीवार, रामदास भोयर, नक्टू सातपुते, सुक्कू कतलामी, गोपी पातर, रमेश भुमर, अनिल पिपरे, चंद्रशेखर भुजाडे यांनी सहभाग घेतला आहे.
हंगामी फवारणी कामगारांना पेन्शन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:08 PM
१९७२ पासून हंगामी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांना ६० वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले आहे. त्या कामगारांना शासनाच्या धोरणाप्रमाणे किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाने केली आहे. यासाठी २६ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.
ठळक मुद्देआंदोलन : पदभरतीची चौकशी करा; सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा