मुख्यमंत्र्यांना निवेदन : आरमोरी तालुका काँग्रेसची मागणीआरमोरी : आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान पिकाला किमान ३ हजार ५०० रूपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी आरमोरीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पीक हे मुख्य पीक आहे. सुमारे दीड लाख हेक्टरवर धान पिकाची रोवणी करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून धान पीक साथ देत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. धानाच्या लागवडीचा खर्च अधिक आहे. त्यामुळे धानाला किमान ३ हजार ५०० रूपये भाव देण्यात यावा. त्याचबरोबर कडाकरपा रोगाने धानाला वेढले आहे. धान पिकाच्या नुकसानीचे तत्काळ सर्वे करण्यात यावा, या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर आरमोरी, देसाईगंज मार्ग दुरूस्त करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतेवेळी माजी उपसभापती चंदू वडपल्लीवार, सरपंच मनीषा दोनाडकर, मंगरू वरखडे, वृंदा गजभिये, उपसरपंच विश्वेश्वर दर्राे, रघुनाथ मोंगरकर, ग्रा. पं. सदस्य नरेश कंगाले, वसंत गेडाम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
धानाला ३५०० रूपये भाव द्या
By admin | Published: October 19, 2016 2:33 AM