लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर टोला येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी भेट घेऊन गावातील व्यवस्थेची पाहणी केली. गावात संगणक प्रशिक्षण व इतर प्रशिक्षणाकरिता ट्रेनिंग हॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.पारंपरिक इलाखा ग्रामसभा सगणापूर व किरण फाऊंडेशन नागपूर यांनी गाव स्वच्छ, सुंदर, स्वयंपूर्ण व उद्योगपूर्ण करण्याचा संकल्प घेऊन किष्टापूर टोला गावाला दत्तक घेतले आहे. गावात विविध कामे केली जात आहेत. गावातील विकास कामांची पाहणी करण्याकरिता शेखर सिंह यांनी किष्टापूर येथे भेट दिली. याप्रसंगी फळांच्या बियांपासून वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेल्या ज्वेलरीचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच जिल्हाधिकाºयांच्या हस्ते ज्वेलरी पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना विविध कामांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांने भेट दिली. दरम्यान गावात वृक्षारोपणही करण्यात आले.गावात संगणक प्रशिक्षण व इतर प्रशिक्षणाकरिता ट्रेनिंग हॉल उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला तहसीलदार अरूण येरचे, किरण फाऊंडेशनच्या संचालिका जयश्री वराडे, वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे उपस्थित होते. सगणापूर इलाख्यातील ५० गावे मिळून ग्रामसभा इलाखा तयार करण्यात आला. या इलाख्यासह किरण फाऊंडेशनच्या वतीने गाव स्वच्छ, सुंदर व स्वयंपूर्ण करण्याकरिता किष्टापूरला दत्तक घेण्यात आले आहे. प्रास्ताविक संतोष सोयाम यांनी केले. ग्रामसभा व किरण फाऊंडेशनच्या सदस्यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.सत्कार व गॅस वाटपकार्यक्रमादरम्यान किष्टापूर टोला परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस वितरणही करण्यात आले.
प्रशिक्षण केंद्राला जागा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:57 AM
लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील किष्टापूर टोला येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी भेट घेऊन गावातील व्यवस्थेची पाहणी केली. गावात संगणक प्रशिक्षण व इतर प्रशिक्षणाकरिता ट्रेनिंग हॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.पारंपरिक इलाखा ग्रामसभा सगणापूर व किरण फाऊंडेशन नागपूर यांनी गाव स्वच्छ, सुंदर, स्वयंपूर्ण व उद्योगपूर्ण ...
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : किष्टापूर टोला गावाला दिली भेट