गडचिराेली : जिल्ह्याच्या विकासासाठी सामाजिक कार्य करून कर्मचाऱ्यांनी आपला अधिकाधिक वेळ कर्मचारी संघटनेच्या न्याय व हक्कासाठी द्यावा, असा सूर उपस्थित मान्यवरांनी काढला. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समिती गडचिरोलीच्या वतीने नायब तहसीलदार तथा समन्वय समितीचे निमंत्रक सुनील चडगुलवार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद चिलबुले हाेते. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपाध्यक्ष मा.चंदहास सुटे, केशवराव कात्रटवार, तहसीलदार महेंद्र गणवीर, पुष्पलता आत्राम, सत्कारमूर्ती सुनील चडगुलवार उपस्थित होते.
सेवानिवृत्त नायब तहसीलदार, एस. के बावणे, हबीब पठाण, धनराज वाकुडकर, जि.प. कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस दुधराम रोहणकर, उपाध्यक्ष संजय खोकले, भास्कर मेश्राम, लतिफ पठाण, गामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, प्रदीप भांडेकर, श्रीकृष्ण मंगर, जयंत मेश्राम, संजीव बोरकर, धनपाल मिसार, प्रमोद कावडकर, राजेश चिल्लमवार, बापू मुनघाटे, मंगला बिरनवार, माया बाळराजे, छाया मानकर, गजानन ठाकरे, राजू रेचनकर, विवेक मून आदी हजर हाेते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गडचिरोली जिल्हा समन्वय समितीचे सरचिटणीस रतन शेंडे यांनी,तर सूत्रसंचालन देवेंद्र दहीकर यांनी केेले. आभार किशोर सोनटक्के यांनी मानले.