स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्यात येत आहे. या उपक्रमाला भेट देऊन रुग्णांच्या नातेवाइकांना चहा व बिस्किटे वितरण आ. नाना पटोले यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन, तथा बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, आ. अभिजित वंजारी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ. डॉ अविनाश वारजूरकर, अतुल लोंढे, गिरीश पांडव, विनोद दत्तात्रय, रवींद्र दरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, पंकज गुड्डेवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, विश्वजित कोवासे, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, प्रतीक बारसिंगे, संजय चन्ने, तोफिक शेख, गौरव ऐनप्रेड्डीवार, विपुल येलेटीवार, दिलीप चौधरी, मिलिंद खोब्रागडे, पिंकू बावणे, नितीन घुले आदी उपस्थित होते.
मागील ५० दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या पुढाकारात भाेजनदान केले जात आहे. मागील वर्षीसुद्धा युवकांनी मजुरांना मदत केली होती. कोरोनाकाळात सर्वसामान्य जनता घाबरून असताना युवक काँग्रेस जनसेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक शब्दांत करता येऊ शकत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.