गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे डेंग्यूची साथ पसरली आहे. गावात भाऊराव चपंक गौरकार यांचा मृत्यू झाला. प्रत्येक घरात एक ते दोन रूग्ण डेंग्यूचे आहेत. या गावाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी डेंग्यू या आजारावर उपाययोजना करण्याकरीता तत्काळ गावात शिबिर सुरू करावे, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेत. आमदार उसेंडी यांनी लक्ष्मणपूर येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन दाखल असलेल्या रूग्णाची पाहणी केली. काही रूग्णांची तपासणीही त्यांनी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चलाख, डॉ. वनकर, डॉ. चौधरी हे उपस्थित होते. त्यानंतर आमदार उसेंडी यांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांना गावात साथरोग आटोक्यात आणण्यासाठी कॅम्प सुरू करावा, असे निर्देश दिले. यावेळी आमदार उसेंडी यांच्या समावेत जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हसनअली गिलानी, जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार सेलचे अध्यक्ष काशिनाथ भडके, चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश ठाकूर, संजय गांधी निराधार योजना समितीचे चामोर्शी तालुकाध्यक्ष विनोद खोबे, सोमनपल्लीचे सरपंच निळकंठ निखाडे, पं.स. सदस्य रूपाली निखाडे, आदिवासी सेलचे संघटक लक्ष्मण कोवे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
डेंग्यूग्रस्त लक्ष्मणपूरला आमदारांची भेट
By admin | Published: May 18, 2014 11:33 PM