शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

भामरागडमधील मोहलाडूंना मिळणार जागतिक बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 11:53 PM

गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात कार्यरत शेकडो बचत गटांकडून विविध वनोपजांपासून खाद्य पदार्थ आणि इतर दर्जेदार वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र बाजारपेठेअभावी त्यांच्या कलागुणांचे आणि मेहनतीला योग्य मोल होत नाही.

ठळक मुद्देमाविमचा अ‍ॅमेझॉनशी करार : बचत गटांच्या उत्पादनांना ‘अच्छे दिन’

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात कार्यरत शेकडो बचत गटांकडून विविध वनोपजांपासून खाद्य पदार्थ आणि इतर दर्जेदार वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र बाजारपेठेअभावी त्यांच्या कलागुणांचे आणि मेहनतीला योग्य मोल होत नाही. पण आता थेट अ‍ॅमेझॉन या मार्केटिंग कंपनीशी करार करून महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) बचत गटांच्या या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून दिली आहे. त्यामुळे भामरागडमधील मोहफुलांपासून बनविलेल्या पौष्टिक लाडूंना आता देशातच नाही तर जगातूनही मागणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात वनोपज मोठ्या प्रमाणावर आहे. दुर्गम भागातील आदिवासी नागरिक ते वनोपज गोळा करून आपली गुजराण करतात. मोहफूल वेचून त्याची विक्री करणे हा आदिवासी लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. त्या मोहफुलांपासून अनेक लोक अवैधपणे मद्यनिर्मिती करतात. परंतू माविमच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनातून बचत गटाने भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे सुरू केलेल्या लाडू प्रकल्पात मोहफुलांपासून पौष्टिक लाडू तयार केले जात आहे.त्रिवेणीसंगम लोक संचालित साधन केंद्र भामरागडद्वारे निर्मित बचत गटाच्या वतीने हा लाडू निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला. त्या मोहफुलाच्या लाडूंना जाणकारांकडून मागणी असली तरी भौगोलिक स्थिती आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे बचत गटाचा हा व्यवसाय मर्यादित राहिला. आता अ‍ॅमेझॉनशी झालेल्या करारामुळे मोहा लाडूसह इतरही उत्पादनांचा विस्तार होईल, अशी आशा वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्राम यांनी व्यक्त केली.हस्तकलेच्या वस्तूही मिळणारअ‍ॅमेझॉनच्या सहेली कॉर्नरवरून सदर मोहा लाडू ग्राहकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत. यासोबतच दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू आणि हस्तकलेच्या वस्तूंचाही समावेश राहणार आहे. वस्तूंची नोंद केल्यानंतर एका क्लिकवर माविम जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली