शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गोकुलनगरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:34 AM

गडचिरोली : येथील गोकुलनगरात नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नाही. त्यामुळे परिणामी वार्डामध्ये बहुतांश ठिकाणी कचºयाचे ...

गडचिरोली : येथील गोकुलनगरात नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नाही. त्यामुळे परिणामी वार्डामध्ये बहुतांश ठिकाणी कचºयाचे ढिग जमा झाले आहेत. या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नगर परिषदेकडे अनेकवेळा तक्रार करूनही स्वच्छता राखण्याबाबत पुरेशी दखल घेतली जात नाही.

तहसील कार्यालयाला रिक्त पदांचे ग्रहण

गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपीक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाºयांवरही कामाचा भार वाढला आहे.

सदोष पाईपलाईनमुळे पाण्याचा अपव्यय

गडचिरोली : स्थानिक नगर पालिका क्षेत्रात खुप जुनी नळ पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या सखल भागातील नळ पाणी पुरवठा दिवसभर सुरू असतो. त्यामुळे हजारो लिटर पाणी व्यर्थ जाते. सखल भागात अनेक ठिकाणी वॉल्व बसविण्याची गरज आहे. मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही वार्डांना पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

अतिक्रमणाचा दिवसा होतो विस्तार

गडचिरोली : रस्त्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर टपºया लहान आहेत. मात्र दिवसा त्यापुढेही विस्तार करून वस्तू ठेवल्या जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

कोरची तालुक्यातील रस्ते दुरूस्त करा

कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरूस्ती करण्याची मागणी आहे.

भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावात विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र यावर वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे या भागातील नागरिक अद्यापही विजेच्या प्रतीक्षेत आहेत.

चौक व बाजार परिसरात स्वच्छतागृहे उभारा

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी नाहक त्रास सहन करावा लागतात.

अनेक नागरिक शिधापत्रिकेपासून वंचित

कुरखेडा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना शिधापत्रिका मिळाली नसल्याने अजूनही ते वंचित आहेत. तहसील कार्यालयात परीपूर्ण कागदपत्रासह अर्ज केल्यानंतरही तालुक्यातील एपीएल नागरिकांना शिधापत्रिका कार्ड देण्यात आले नाही.

सामान्य रुग्णालयातील लिफ्ट सुरू करा

गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट मागील अनेक दिवसापासून बंद आहे. लिफ्टची व्यवस्था केल्यानंतर केवळ दोन ते तीन दिवस लिफ्ट सुरू होती. त्यानंतर लिफ्ट बंद करण्यात आली. लिफ्ट सुरू करण्याची मागणी होत आहे.

रामपूर येथील

दत्तमंदिर दुर्लक्षित

आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे प्राचीन काळापासून दत्ताचे आहे. मंदिरात शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष असून मंदिर विकासापासून अजुनही दुर्लक्षितच आहे.

प्रत्येक तालुक्याला अग्निशमन यंत्रणा द्या

गडचिरोली : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १६४८ गावे आहेत. घटनांच्यावेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत.प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.