लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे आवागमनासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली शहरातील गोकुलनगर बायपास, रेड्डीगोडाऊन बायपास, धानोरा मार्गावरून शिवाजी महाविद्यालयाकडून रेड्डी गोडाऊन चौकाला जोडणाºया मार्गाची बकाल अवस्था झाली आहे. सदर तिन्ही मार्गावर वाहनांची वर्दळ दिवसा व सायंकाळी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय शहरातील कारमेल शाळेच्या मागील परिसरातील रस्ते खड्डेमय झाले असून पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असते. आता पावसाळा लागल्यामुळे या वस्तीतील अनेक रस्त्यांना दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वामी विवेकानंद नगर व गोकुलनगर, चनकाई नगर व इतर भागातील रस्त्यांची अवस्था दयनिय आहे. सदर रस्त्यांची पक्की दुरूस्ती करण्यात यावी अथवा सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते पालिकेने तयार करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र आवश्यक त्या ठिकाणी पक्के रस्ते तयार करण्याबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडले आहे. लांझेडा, इंदिरा नगर, फुले वार्ड, बसेरा कॉलनी, शिक्षक कॉलनी व इतर बºयाच भागातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पक्क्या नाल्यांचा अभाव आहे. पावसाळ्यात नाल्यातील सांडपाणी व पावसाच्या पाण्याने छोट्या नाल्या तुडूंब भरतात. सदर पाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. पालिकेच्या नियोजनशुन्य कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.चिखलमय रस्त्यावर मुरूम पडण्यास एक महिना लागणारगडचिरोली नगर पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला चिखल निर्माण होणाºया अंतर्गत रस्त्यावर मुरूम टाकून आवागमनासाठी नागरिकांची सुविधा केली जाते. मात्र यंदा पालिका प्रशासनाच्या वतीने मुरूम टाकण्याच्या कार्यवाहीत बराच विलंब होत आहे. सदर कार्यवाहीसाठी सुरूवातीला न.प.च्या सभेत ठराव पारित करावा लागतो. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवावी लागते. मात्र प्रशासनाच्या वतीने अद्यापही मुरूमाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. टेंडर न झाल्याने अंतर्गत चिखलमय रस्त्यावर प्रत्यक्ष मुरूम पडण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
गोकुलनगर बायपास मार्गाची अवस्था बकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:29 AM
स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे.
ठळक मुद्देपालिका प्रशासन सुस्त : आवागमनासाठी वाहनधारकांची कसरत