लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांसाठी असलेल्या गोंडवाना विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या ७ सप्टेंबर २०२० रोजी संपणार आहे. त्यामुळे विद्यापीठ कायद्यानुसार गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदावर पोहोचण्यासाठी काही शिक्षणतज्ज्ञांनी हालचाली सुरू केल्या आहेत.गोंडवाना विद्यापीठाच्या कायद्यानुसार नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी करावी लागते. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या ४ एप्रिलच्या सभेत यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या २८ एप्रिल रोजी व्यवस्थापन व विद्या परिषदेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कुलगुरू निवड प्रक्रियेतील तीन तज्ज्ञ सदस्यांपैकी एका तज्ज्ञाची निवड केली जाणार, अशी माहिती कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी लोकमतशी बोलताना दिली. निवड समितीमधील उर्वरित दोन सदस्य राज्यपाल ठरवित असतात. विद्यापीठ कायद्यानुसार हे तीन सदस्य भारतातील अनेक नामांकित संस्थांमध्ये कार्यरत असावे किंवा निवृत्त न्यायाधीश तसेच सरकारच्या उपक्रमात प्रमुख म्हणून राहिलेले तज्ज्ञ व्यक्ती असतात. सदर तीन सदस्य कुलगुरूपदासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून आणखी पाच नावे राज्यपालांना देतात. या पाच उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेऊन अखेर कुलगुरू निश्चित केला जातो. डॉ.कल्याणकर हे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ठरणार आहेत.कोरोनाचे संकट टळल्यावरच उन्हाळी परीक्षागोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची सभा ४ एप्रिल रोजी आॅनलाईन स्वरूपात पार पडली. या सभेत उन्हाळी परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कोरोनाच्या संचारबंदीमुळे १ ते १४ एप्रिल हा १४ दिवसांचा कालावधी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या म्हणून जाहीर करण्यात आल्या. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा घेण्यात येतील, असे या सभेत ठरविण्यात आले.
‘गोंडवाना’ला नवीन कुलगुरूचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:00 AM
गोंडवाना विद्यापीठाच्या कायद्यानुसार नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी करावी लागते. त्याअनुषंगाने गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या ४ एप्रिलच्या सभेत यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. येत्या २८ एप्रिल रोजी व्यवस्थापन व विद्या परिषदेची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ठळक मुद्देहालचाली वाढल्या : सप्टेंबरमध्ये संपणार कल्याणकर यांचा कार्यकाळ