शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

खुशखबर ! जुने जन्म-मृत्यू रेकाॅर्ड आता मिळणार ग्रामपंचायतींमधून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 10:04 PM

पूर्वी जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना सावली येथे पंचायत समितीत यावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतींमधून जन्म-मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.जुने जन्म -मृत्यूच्या दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत होत्या; परंतु या निर्णयामुळे गावातच दाखले मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत.  

दिलीप फुलबांधेलोकमत न्यूज नेटवर्कगेवरा :  अनेक वर्षांपासूनचे जुने जन्म-मृत्यूचे रेकॉर्ड पंचायत समितीकडे असल्यामुळे गावातून तालुक्यात येऊन दाखला मिळविण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत होती. आता पंचायत समितीने सर्व रेकॉर्ड ग्रामपंचायतींना पाठविण्याचा निर्णय घेतला असून, यापुढे ग्रामपंचायतींमधून दाखले मिळणार आहेत. या निर्णयाचे तालुक्यातील जनतेने स्वागत केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जुने जन्म - मृत्यू रेकॉर्ड पंचायत समितीकडे जमा करण्यात आले होते. सावली तालुक्यातील नागरिकांना जुने जन्म - मृत्यू दाखले काढायचे असल्यास सावली येथील पंचायत समिती कार्यालयात यावे लागते होते. आठवड्यातून दोन दिवस दाखले देण्याचे ठरले होते, मात्र त्या दिवशी अचानक  अधिकारी बैठकीसाठी किंवा कामासाठी गेल्यास नागरिकांना रिकाम्या हाती परत जावे लागत होते. अनेकदा रेकॉर्ड नसल्यास दाखले उपलब्ध नसल्याचा दाखला घेऊन परत जावे लागत असे.नागरिकांना पायपीट करावी लागत असे.  ही बाब पंचायत समिती पदाधिकारी यांच्या लक्षात आली. त्यांनी मासिक सभेत जन्म-मृत्यू रेकॉर्ड ग्रामपंचायतींना परत करण्याचा ठराव घेतला. हा ठराव रवींद्र बोलीवार यांनी मांडला व सर्वानुमते सभापती विजय कोरेवार, सदस्य तुकाराम ठिकरे, गणपत कोठारे, छाया शेंडे, मनिषा जवादे, ऊर्मिला तरारे, संगीता चौधरी यांनी ठरावाला मान्यता दिली. गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांनी अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींना रेकॉर्ड परत केले.

नागरिकांची पायपीट थांबलीपूर्वी जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना सावली येथे पंचायत समितीत यावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतींमधून जन्म-मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

जुने जन्म -मृत्यूच्या दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत होत्या; परंतु या निर्णयामुळे गावातच दाखले मिळत असल्याने नागरिक समाधानी आहेत.   या निर्णयासाठी बिडीओ मरस्कोल्हे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन दाखले घ्यावेत.                 -विजय कोरेवार,  सभापती, सावली

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत