गडचिराेली : राहत्या घरातून विक्रीसाठी देशी दारू बाळगणाऱ्या व दुचाकीने दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आराेपींना आरमोरी पोलिसांनी १ डिसेंबर राेजी जेरबंद केले. दोन्ही घटनेतील आरोपींकडून देशी दारूसह १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१ डिसेंबर राेजी नाजूक लहानू मेश्राम रा. अरसोडा याच्या घराची पोलिसांनी पंचासमक्ष तपासणी केली असता त्याच्या घरातून एकूण २५ हजार ९७० रुपये किमतीची दारू जप्त केली. त्याला ही दारू राहुल कैलास टेभुर्णे रा. आरमोरी इंदिरानगर बर्डी याने चिल्लर विकीसाठी दिल्याचे सांगितले.
तर २ डिसेंबर रोजी रूपेश रेकचंद ठवरे व प्रवीण भाऊराव खोब्रागडे दाेघेही रा. आरमोरी हे दारूची वाहतूक करताना दुचाकीसह पकडले गेले. त्यांच्याकडून ४२ हजारांची दारू व ५० हजार रुपये किमतीच्या दुचाकीसह एकूण ९२,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यात एकूण १ लाख १७ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.