प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : मानवाची जिज्ञासू वृत्ती नेहमीच नव्याचा शोध घेत असते. त्यातूनच नव्या प्रयोगाला चालना मिळते. वैरागड येथील गोपी खुशाल सावरकर या अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. सदर सायकल ताशी २० किमी वेगाने धावत असून तेवढे अंतर कापण्यासाठी केवळ दोन युनिट विजेची गरज भासते. गोपीचा हा प्रयोग परिसरातील नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.गोपी हा गडचिरोली येथील नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. काही तरी नवीन करण्याच्या शोधात असलेल्या गोपीने बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली. नियमित वापरात असलेल्या सायकलला त्याने २४ वॅट ८ एपीआरच्या दोन बॅटऱ्या बसविल्या. मोटारचे कंट्रोलर एक्सलेटरचे काम करते. सायकलला बॅटरी लावण्यासाठी जवळपास १४ हजार रुपयांचा खर्च आला. रात्रीच्या वेळी सायकल चालविण्यासाठी अडथळा होऊ नये म्हणून दुचाकी वाहनाप्रमाणेच लाईट सुध्दा बसविले आहेत. दोन युनिटमध्ये २० किमी अंतर पार करीत असल्याने पेट्रोलच्या तुलनेत सदर सायकल फायद्याची आहे.तसेच जी व्यक्ती ६० हजार रुपयांचे दुचाकी वाहन खरेदी करू शकत नाही, अशा व्यक्तींसाठी जवळपास १५ हजार रुपयात तयार होणारी सायकल दुचाकीचे काम करू शकणार आहे. गोपीची सायकल पायाने अपंग असलेल्या व्यक्तीलाही फायद्याची ठरू शकते.विजेचा खर्च टाळण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी सायकल तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे. फेरीवाले व इतर व्यावसायिक दुचाकीचा वापर करतात. ओझेसुध्दा वाहून नेऊ शकतील, अशी सायकल तयार करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.- गोपी सावरकर, वैरागड
गोपीने बनविली बॅटरीवरची सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:26 PM
मानवाची जिज्ञासू वृत्ती नेहमीच नव्याचा शोध घेत असते. त्यातूनच नव्या प्रयोगाला चालना मिळते. वैरागड येथील गोपी खुशाल सावरकर या अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली आहे. सदर सायकल ताशी २० किमी वेगाने धावत असून तेवढे अंतर कापण्यासाठी केवळ दोन युनिट विजेची गरज भासते. गोपीचा हा प्रयोग परिसरातील नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.
ठळक मुद्देदोन युनिट विजेचा खर्च : एका तासात कापते २० किमी अंतर