सन १९७८ ते २०१३ पर्यंत चालत आलेल्या कर्ज याेजनेचे रूपांतरण १०० टक्के अनुदानित करण्यात आले आहे. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना राेख २ हजार व २ हजार किमतीचे धान्य पुरविण्याची तरतूद आहे. या याेजनेत एकूण ४ हजार रुपये किमतीचा लाभ अनुज्ञेय आहे. यामध्ये ५० टक्के वस्तुरूपाने तर ५० टक्के राेख स्वरूपाने लाभ दिला जाताे.
जिल्ह्यात अहेरी, भामरागड व गडचिराेली हे तीन आदिवासी प्रकल्प आहेत. या तीनही प्रकल्पातील लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात दाेन हजार रुपयांचे अनुदान वळते करण्यात आले आहे. लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या ९० टक्केच्या जवळपास आहे. बँक खाते अद्ययासवत नसणे, चुकीचे खाते क्रमांक आदींमुळे काही लाभार्थ्यांना राेख रकमेचा लाभ मिळाला नाही.
(बाॅक्स)
या वस्तूंची प्रतीक्षा कायम
दुसऱ्या टप्प्यात धान्य व किराणा वस्तू देय आहेत. यामध्ये दाेन हजार रुपये किमतीचे मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, साखर, शेंगदाणे, तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहापत्ती आदी वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंचा पुरवठा आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने जुलै महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.