लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाजाला आरक्षणासह सवलती देण्यात यावा, या मागणीला घेऊन आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समिती महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शासनाकडून जोपर्यंत आरक्षण व सवलतीबाबत निर्णय होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा जमात समितीच्या पदाधिकारी व समाज बांधवांनी दिला आहे.या आंदोलनात समितीचे जिल्हा संयोजक डेडू राऊत यांच्यासह मानवत राणा, नाना ठाकूर, राजू राऊत, हरीष कुंज्यामी, भाऊजी नेवारे, सुनील नेवारे, मोहन राऊत, किशोर नेवारे, भाऊराव नेवारे, दिलीप नेवारे, रवी वाघाडे, श्रावण वाघाडे, वसंत मानकर, देवराव खंडरे आदीसह जवळपास दीडशे समाज बांधव सहभागी झले आहेत. आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत असल्याबाबतचे निवेदन समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ आॅगस्ट २०१८ रोजी ऐतिहासिक निर्णय देऊन गोवारी ही जमात आदिवासी असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाला चार महिने उलटले. मात्र शासनाकडून सवलती देण्यासंदर्भात कार्यवाही झाली नाही.उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान दिले होते. मात्र या आश्वासनाची अद्यापही पूर्तता झाली नाही.त्यामुळे आपल्या न्याय हक्कासाठी आदिवासी गोवारी समाज बांधवाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्निवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, समाज संघटनेच्या वतीने अशा प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रच्या सर्व जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा संयोजक डेडू राऊत यांनी दिली आहे.
गोवारी समाजाचे अन्नत्याग आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 1:09 AM
जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाजाला आरक्षणासह सवलती देण्यात यावा, या मागणीला घेऊन आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समिती महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
ठळक मुद्देआरक्षण देण्याची मागणी : जिल्हाभरातील दीडशे समाजबांधव सहभागी