आरोग्यसेवा बळकटीकरण : प्रत्येक केंद्रात १० पदे भरली जाणारगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्र व चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा आरोग्य केंद्रात पदभरतीला राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार दोन्ही आरोग्य केंद्रात प्रत्येकी १० पदे विविध प्रवर्गातील भरली जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात राज्य शासनाच्या आरोग्य सेवेशिवाय दुसरी आरोग्य यंत्रणा नाही. एटापल्लीसारख्या दुर्गम भागात अनेक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना अहेरी उपजिल्हा रुग्णालय किंवा गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचारासाठी यावे लागते. अनेकदा गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा नसल्याने अहेरी व गडचिरोलीकडे हलविले जाते. गेल्या काही महिन्यांपासून अहेरी उपविभागातील गरोदर माता व इतर रुग्णांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी होती. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस राज्याच्या आरोग्य विभागाने मान्यता प्रदान केली आहे.यासंदर्भात राज्य शासनाने २ जानेवारी २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यासाठी संबंधित दवाखान्यांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तांत्रिक पदावरील अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती आधी करावी, त्यानंतर अ तांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, असे शासन निर्णयात नमूद आहे. लवकरच यासंदर्भातील पदभरती होईल. (स्थानिक प्रतिनिधी)असे होतील अधिकारी, कर्मचारी नियुक्तभेंडाळा व बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाने पदभरती निर्मितीस मान्यता दिली आहे. त्यानुसार या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्यसेवक (पुरूष), आरोग्य सहायक (स्त्री), सहायक परिचारिका, प्रसविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, मिश्रक, कनिष्ठ लिपीक, स्त्री परिचर, पुरूष परिचर या संवर्गातील प्रत्येकी एक पदाचा समावेश आहे. वाहनचालक व सफाईगारही मिळणारप्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालविण्यासाठी वाहनचालकाचे पद भरणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा व एटापल्ली तालुक्यातील बुर्गी या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनचालक व सफाईगाराचे प्रत्येकी एक पद बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून भरण्यात येणार आहेत.
बुर्गी व भेंडाळा आरोग्य केंद्रात पदभरतीला शासनाची मान्यता
By admin | Published: January 12, 2017 12:54 AM