देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील स्मशानभूमीलगत मिश्र रोपवन लावण्यासाठी शासकीय स्तरावरून चिंतामण सदाशिव खानोरकर यांना महसूल विभागाची जागा अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात आली होती. २००४-०५ मध्ये खानाेरकर यांचे कुटुंब नागपूरला राहायला गेल्याने तेही त्यांच्या सोबत निघून गेले. दरम्यान पडीक असलेल्या जागेवर देसाईगंज येथील भूमाफियांनी अनधिकृतरीत्या तब्बल ३४ प्लाॅट पाडले. त्यापैकी ३० प्लाॅटची प्रति प्लाॅट १ लाख ५० हजार ते २ लाख रुपये दराने विक्री केली. याबाबत ‘लाेकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले हाेते. त्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले.
तथापि या प्रकरणाशी संबंधित खानोरकर यांच्या नागपूर येथील वारसांना नोटीस बजावण्यात आली आहे. शर्थभंग करण्यात आली असल्याने सदर जागा शासन जमा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती तहसीलदार संतोष महले यांनी ‘लाेकमत’ला दिली.
बाॅक्स
प्लाॅट खरेदीदार हादरले
काही नागरिकांनी दीड ते दाेन लाख रुपये देऊन अवैधरीत्या तयार केलेले प्लाॅट खरेदी केले आहेत. आता ही जागा सरकारी निघाली आहे. ही जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी प्लाॅट खरेदी केले, त्यांनी आता पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
240921\img-20210911-wa0050.jpg
हीच ती कुरुडची अतिक्रमीत जागा ,शासन जमा होणार