सरकार करत आहे दडपशाहीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:14 AM2019-08-29T00:14:53+5:302019-08-29T00:15:25+5:30

विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही.

The government is using repression | सरकार करत आहे दडपशाहीचा वापर

सरकार करत आहे दडपशाहीचा वापर

Next
ठळक मुद्देनाना पटोले यांचा आरोप : देसाईगंजात महापर्दाफाश सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : सध्या देशात गल्ली ते दिल्लीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत अनेक चौकशा लावल्या जात आहे. स्वत: केलेले पाप लपविण्यासाठीच सरकारकडून दडपशाहीचा वापर करून विरोधकांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख, माजी खा.नाना पटोले यांनी केला. या फेकू सरकारची सत्ता उलथवून लावणारच, असा विश्वासही त्यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.
देसाईगंज येथील लाखांदूर मार्गावरच्या सभागृहात बुधवारी काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महापर्दाफाश सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, प्रदेश पदाधिकारी रवींद्र दरेकर, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड.संजय गुरू, जीवन नाट, प्रभाकर तुलावी, भागवत नाकाडे, शीला पटले, मनीषा दोनाडकर, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, नगरसेवक आरिफ खानानी आदी आजी-माजी पदाधिकारी मंचावर विराजमान होते.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही. ओबीसींना त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपच्या सरकारने केले आहे, असा आरोप पटोले यांनी केला. ज्या संविधानाच्या भरवशावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याच संविधानाला जाळण्याचे पाप या सरकारच्या काळात होऊनसुद्धा यातील आरोपी मोकाट आहेत, असा ठपका पटोले यांनी ठेवला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सूरजागड लोहप्रकल्प मार्गी लावून लगतच्या चारही जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देणार, तसेच शेती सुजलाम सुफलाम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पटोले यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अ‍ॅड.संजय गुरू, संचालन परसराम टिकले यांनी तर आभार भूषण अलामे यांनी मानले. सभेला कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन बिघडले
काँग्रेसच्या महापर्दाफाश सभा देसाईगंज आणि गडचिरोली येथे आयोजित केल्या होत्या. देसाईगंज येथील सभा दुपारी ३ वाजता तर गडचिरोली येथील सभा सायंकाळी ६ वाजता होणार असल्याचे पदाधिकाºयांनी जाहीर केले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील सभांना उशीर झाल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले सायंकाळी ६ वाजता देसाईगंजमध्ये पोहोचले. गडचिरोलीतील सभा ही उशिराने सुरू झाली. विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिटीने काढलेल्या निमंत्रणात देसाईगंज येथील कार्यक्रमाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी आणि शह-काटशहचे राजकारण सुरूच असल्याचे दिसून आले.

Web Title: The government is using repression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.