आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्यातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने राज्य व केंद्र शासन अधिकाधिक स्वयंरोजगार निर्मितीवर विशेष भर देत आहे. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा युवकांनी लाभ घेऊन उद्योग स्थापन करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर गणराज्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पोलीस दल तसेच गृहरक्षक दल यांची त्यांनी सलामी स्वीकारली. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या रूपाने दीड लाख रूपयापर्यंत कर्जमाफीची योजना आणली. यात नियमित कर्ज फेडणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर २५ हजारांची रक्कमही शासनाने दिली आहे. जिल्हाभरातील २९ हजार ६०० शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. बँकांना सुमारे ८० कोटीहून अधिक रूपये शासनाने दिले आहेत. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र कमी केले आहे. जिल्ह्यात साडेचार लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आणि शेतकºयांना ४४ कोटीहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.शेतीसाठी पाण्याची उपलब्धतता व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार हे अभियान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आले. आता याला लोकचळवळीचे रूप आले आहे. पहिल्या टप्यात गडचिरोली जिल्ह्यातील १५२ गावे जलयुक्त झाली. त्यानंतर १६९ गावांची निवड करण्यात आली. यापैकी १४८ गावे जलयुक्त झाली आहेत.आपला जिल्हा हा आदिवासीबहुल आहे. जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी सातत्याने शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील सर्वच मुख्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यासोबतच आर.आर.पी. २ अंतर्गत रस्ते व ३३ पुलांच्या कामांना नुकतीच मंजुरी प्राप्त झाली आहे. यातच अहेरी-भामरागड ते नारायणपूर या नव्या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजूर झाले आहे.रस्त्यांमुळे सुलभ परिवहन तर शक्य होणार आहे, सोबत छत्तीसगड आणि तेलंगणा ही शेजारील राज्ये जवळच्या मार्गाने जोडली जातील. याचा फायदा जिल्ह्यातील रोजगार आणि पर्यटनास होणार आहे. या सर्वांना मंजुरी प्रदान झाली आहे.जिल्ह्यात ३१ हजारांहून वैयक्तिक वनपट्टे वाटपाचे काम महसूल विभागाने केले आहे. या जमिनींचे सातबारा उतारे देखील आदिवासी बांधवांच्या नावे करण्यात येत आहेत. या सर्व कामांसोबत इतर सर्व सातबारा आॅनलाईन उपलब्ध होतील, या दृष्टिकोनातून प्रशासन काम करीत आहे. सुमारे २६७ गावे अंधारात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौभाग्य योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गाव विजेने उजळेल यासाठी प्रयत्न चालविले आहे. जिल्ह्यात ११८ गावांना वीज पुरवठा सुरु झाला असून उर्वरीत गावांमधील अंधार मार्च अखेर दूर होणार आहे. ४९ गावांत सौर ऊर्जेद्वारे अंधार दूर करण्यात येणार आहे ते काम देखील गतिमान झाले आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.जिल्ह्यातील तरुणांनी रोजगारासोबत स्वयंरोजगार निर्माण करावा यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे. एकहंगामी शेतीच्या या जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ८४ कोटीहून अधिक रुपये मजुरीच्या रुपात देण्यात आले आहेत.तेंदू पत्ता, बांबू तसेच इतर गौण वन उपज यावर ग्रामपंचायतींचा हक्क आहे. यातून ग्रामपंचायतींना १५० कोटीहून अधिक रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. वनांवर आधारित उद्योग उभारण्याची इथे खूप मोठी संधी आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ अंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. यातील चांगले प्रकल्प आपल्या जिल्ह्यात यावे, यासाठी पालकमंत्री म्हणून माझे प्रयत्न सुरु राहतील, असे आत्राम म्हणाले. संचालन क्रीडा अधिकारी मदन टापरे, आसमवार यांनी केले. आभार कुकडे यांनी मानले.पोलीस, शिक्षक व खेळाडूंचा झाला गौरवयाप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस विभागातून तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप मंडलीक, राजेश खांडवे, पोलीस नाईक नागसू उसेंडी, पोलीस शिपाई नीलेश मडावी, रमेश आत्राम, बबलू पुंगडा यांचा, तर शिक्षण विभागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय नार्लावार यांचा गौरव करण्यात आला. असामान्य बुध्दीमतेचा बालक तुहिन मडावी याचाही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू एंजल देवकुले, अवंती गांगरेड्डीवार, रजत सेलोकर, यशश्री साखरे व मार्गदर्शक संदीप पेदापल्ली यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. गोंडवाना सैनिकी स्कूल गडचिरोली येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त खेळाडू प्रज्वल भानारकर, हुतेश खराबे यांचा आणि राज्यस्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट स्पर्धमध्ये यशस्वी झालेले यशराज धर्मदास सोमनानी याचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला.दुचाकी रुग्णवाहिकेचा शुभारंभपालकमंत्री जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्यासंदर्भात सेवा देण्यासाठी मोटार सायकल रुग्णवाहिका सेवा सुरु करण्याचा मनोदय यापूर्वी व्यक्त केला होता. प्रजासत्ताकदिनी मोटारसायकल रुग्णवाहिकेचा शुभारंभ पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते झाला. सर्वसाधारण स्थितीत असलेल्या रुग्णाला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यासाठी यामुळे फार मोठी मदत होणार आहे. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.प्रथमच ड्रोन कॅमेराद्वारे या सोहळ्याची क्षणचित्रे टिपण्यात आली.पोलीस विभागाचे कौतुकगेल्या ३ वर्षांच्या कालावधीत नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस दलाने प्रचंड मेहनत घेतली आहे. शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत २२ जणांनी या काळात समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग स्वीकारला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह पोलीस विभागातील अधिकाºयांचे व जवानांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.२३५ ग्रामपंचायती हागणदारीमुक्तग्रामीण भागातील स्वच्छता आणि पिण्याचे पाणी याकडे सर्वच यंत्रणा लक्ष देत आहेत. जिल्ह्यात २३५ ग्रामपंचायती तसेच २ नगरपालिका हागणदारीमुक्त झाल्या आहेत. संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचारी सुद्धा कामाला गती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम आदमी केंद्रस्थानी मानून केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना आणल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, पंडित दिनदयाल उपाध्याय घरकूल योजना यासोबतच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, पंतप्रधान जीवनज्योती जीवन योजना, अटल पेन्शन योजना तसेच मुद्रा लोन योजना आदी अनेक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केला जात आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
स्वयंरोजगार निर्मितीवर शासनाचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:15 PM
राज्यातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने राज्य व केंद्र शासन अधिकाधिक स्वयंरोजगार निर्मितीवर विशेष भर देत आहे.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : पोलीस मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण