लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. मुलीला जन्मत:च वाचवून तिला चांगल्या दर्जाचे शिक्षण देणे व स्वत:च्या बळावर जीवन जगण्यासाठी तिला सक्षम करण्यास केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.निर्भय बेटी सुरक्षा अभियान समिती शाखा गडचिरोली व नगर परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींचे आत्मसुरक्षा विषयक प्रात्यक्षिकांचे सामुहिक प्रदर्शन शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे, पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड, डॉ. महेश कोपुलवार, डॉ. सुलोचना मडावी, डॉ. देविदास मडावी, विलास निंबोरकर, नगरसेविका लता लाटकर, संजय कटकमवार, ज्ञानेश्वर गुरव, बंडू क्षिरसागर, रजनी दोनाडकर, वत्सला बारसिंगे, नानाजी सुरपाम, हरीदास उईके, रामनाथ खोब्रागडे, अविनाश आत्राम, राजू भारती, अर्चना उमरे आदी मान्यवर उपस्थित होते. जवळपास ५० पेक्षा अधिक शाळांच्या विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी सर्वच क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणावर शासनाचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 1:21 AM
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. मुलीला जन्मत:च वाचवून तिला चांगल्या ...
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे प्रतिपादन : निर्भय बेटी सुरक्षा अभियानातील मुलींच्या आत्मसुरक्षेचे सामूहिक प्रदर्शन