ऑनलाईन लोकमतजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी ग्राम पंचायतीने गाव विकासासोबतच ग्रा. पं. अंतर्गत जि. प. शाळेला विविध साहित्य आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक वस्तू देऊन जि. प. शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढला आहे.भाकरोंडी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक विकासाच्या बाबतीत बऱ्याच सोयीसुविधांचा अभाव होता. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत मुख्याध्यापक जीवन शिवणकर यांनी रूजू होताच शाळेतील अनेक समस्या व अडचणी जाणून घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात भर घालणाºया साहित्यांची आवश्यकता शालेय व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले आणि या संदर्भात प्रस्ताव सरपंच सरिता दुगा यांच्याकडे सादर केला. ग्राम पंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य उपलब्ध करून दिले. दुर्गम भागातील विद्यार्थी इंटरनेटद्वारे जगाच्या सानिध्यात यावे, सर्व क्षेत्रात पारंगत व्हावे, या उद्देशाने व डिजिटल शाळेची संकल्पना ठेवून शाळेला तीन एलसीडी संच, तीन मोबाईल, दोन कपाट उपलब्ध करून दिले. तसेच २४ तास पाणीपुरवठा करण्याकरिता नळ कनेक्शन, पाणी फिल्टर, दहा तोट्यांचे हँडवॉश स्टेशन बसविले. शाळेचे स्वयंपाकघर, शौचालयात २४ तास पाणीपुरवठा, ५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, ३० जेवणताटासह दोन बकेट, दोन कटोरे आदी साहित्य भेट दिले. जि. प. शाळेत एकूण सात वर्गात ९६ विद्यार्थी संख्या आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्याकरिता ग्राम पंचायतीने केलेली मदत ‘आमचा गाव, आमचा विकास’ ही संकल्पना पूर्ण करणारी असून तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींना प्रेरणा देणारी आहे.
ग्रा.पं.ने वाढविला शाळेचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:29 AM
आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी ग्राम पंचायतीने गाव विकासासोबतच ग्रा. पं. अंतर्गत जि. प. शाळेला विविध साहित्य आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक वस्तू देऊन जि. प. शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढला आहे.
ठळक मुद्देसाहित्य उपलब्ध : भाकरोंडीत प्रशासनाचा जि. प. शाळा विकासावर भर