पुराडा : धानाचे उत्पादन घटल्याने यावर्षी कुरखेडा तालुक्यातील पुराडा धान खरेदी केंद्रावरील धानाची आवक घटली आहे. खासगी व्यापाऱ्यांपेक्षा आधारभूत धान खरेदी केंद्रावर अधिक भाव मिळत असल्याने सर्वच शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानविक्रीस प्राधान्य देतात. मागील वर्षी धानाचे उत्पादन चांगले झाले हाेते. त्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासूनच आवक वाढली हाेती. या वर्षी मात्र बहुतांश शेतकऱ्यांना ६० ते ७० टक्केच उत्पादन झाले आहे. घरी खाण्यासाठी थोडे धान ठेवले जाते. इतर धानाची विक्री केली जाते. काही शेतकऱ्यांना तर केवळ खाण्याएवढेच धान झाले आहेत. विकण्यासाठी त्यांच्याकडे धान्यच शिल्लक नाही. परिणामी यावर्षी धानाची आवक घटली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांची रेलचेल दिसून येत नाही. मागील वर्षी २८ हजार क्विंटल धान खरेदी झाली हाेती. यावर्षी धान खरेदी घटली आहे.
धानाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:35 AM