तालुक्यात ३२ हजार हेक्टरवर खरिपात धान पिकांची लागवड केली जाते. यासोबतच पाच हजार हेक्टरवर कापूस पिकांची लागवड केली जाणार आहे. शेतकरी मे महिन्यात शेतातील आंतरमशागतीचे कामे आटपून मृग नक्षत्रात पेरणी करण्याचे बेत आखले होते. ८ जून रोजी मृग नक्षत्रास सुरुवात झाली. सुरुवातीपासून पाऊस सुरू झाला. त्यामुळे धान पऱ्हे टाकणाच्या भातखचरात पाणी साचून दलदल निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना धान पेरणी काम करणे अवघड झाले. नक्षत्र संपण्याच्या वाटेवर असताना शेतकऱ्यांनी पेरणी कामास सुरुवात केली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या कामाला गती आली आहे. त्यामुळे शेतकरी शेताच्या बांधावर थवेच्या थवे दिसून येत असून, गाव कूस ओसाड दिसू लागले आहे. शेतकरी दोन पद्धतीने धान पिकांचे उत्पादन घेत असतात यात आवत्या पद्धतीने व रोवणी पद्धतीने धान पिकांची लागवड करीत असतात. मात्र दिवसेंदिवस लागवड खर्च वाढत जात असल्याने शेतकरी सध्या रोवणी खर्च वाचविण्यासाठी आवत्या पद्धतीला पसंती दिली आहे. आवत्या पेरणीचे काम करताना शेतकरी दिसून येत आहेत, तर कापूस पिकांची लागवड करण्यासाठी शेतकरी बी टिबण्याचे काम करीत आहेत.
बाॅक्स
शेतकऱ्यांना बाेनसची प्रतीक्षा
आधारभूत किमतीत धान विक्री केल्यावर प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र खरीप व रब्बी हंगाम संपून सुद्धा अजूनही शेतकऱ्यांना बोनसचे पैसे खात्यात जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. काही शेतकऱ्यांना अजूनही विक्री केलेल्या धानाचे चुकारे मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी पीककर्ज घेऊन पीक लागवड खर्च करीत आहेत. काही शेतकरी उसनवारी मागून बी-बियाणे खरेदी केले आहेत.
===Photopath===
210621\5451img_20210619_114734.jpg
===Caption===
पेरणी कामाला वेग शेतकरी बांधावर फोटो