शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

भाजपसह आविसंची ग्रामपंचायतीत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:11 PM

जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतमधील सात सदस्य व एका सरपंचपदासाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष साजरा केला.

ठळक मुद्देविहीरगावचे सरपंचपद भाजपच्या ताब्यात : कोर्ला माल व कोटापल्ली पोटनिवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघाचे वर्चस्व

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतमधील सात सदस्य व एका सरपंचपदासाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला. निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह विजयाचा जल्लोष साजरा केला.गडचिरोली - गडचिरोली तालुक्यातील विहिरगाव येथे राखीव जागेवर झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार प्रीती कन्नाके या विजयी झाल्या. येथील सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने सरपंचपदावर त्या बहुमताने निवडून आल्या. त्यामुळे विहिरगाव ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. निवडणूक निकाल घोषित झाल्यानंतर गडचिरोली येथे आ.डॉ. देवराव होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात जल्लोष करण्यात आला. आ.डॉ. देवराव होळी यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत करून त्यांना पेढा भरविला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका महामंत्री बंडू झाडे, श्रीकृष्ण कावनपुरे, दलित आघाडीचे जनार्धन साखरे, ओबीसी नेते भास्कर बुरे, यशवंत झरकर, विहिरगावचे उपसरपंच भक्तदास नवघडे, राखी येथील अनिल कोठारे, अशोक वासेकर, नेताजी वासेकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.चामोर्शी - तालुक्यातील चंदनखेडी, घोट व गणपूर (रै.) या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. मतमोजणीनुसार चंदनखेडी ग्रामपंचायत प्रभाग क्र. १ मधून कुंदा रामभाऊ इजमनकार यांचा विजय झाला तर गणपूर (रै.) ग्रामपंचायमधील प्रशांत सोमय्या मेकलवार यांची अविरोध निवड झाली. घोट ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्र. २ मध्ये एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी समीर धोंडू भोयर हे सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले. चंदनखेडी, गणपूर (रै.) येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.आर.कांबळे यांनी तर घोट येथे एस.डी.बारसिंगे यांनी तहसीलदार ए.डी.येरचे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले.सिरोंचा - तालुक्यातील कोर्ला माल ग्रा.पं.च्या सरपंच पदासाठी तब्बल पंधरा वर्षांनी रविवारी पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीचा निकाल सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. कोर्ला माल ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती (स्त्री) यांच्यासाठी राखीव होते. या पदासाठी आविसंकडून वेलादी सुशीला गणपती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कर्नम मारुबाई शंकर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ५३३ मतदारांनी मतदानाची हक्क बजाविला होता. मतमोजणीत आविसंच्या उमेदवार वेलादी सुशीला गणपती यांना ३२३ मते तर राष्टÑवादी काँग्रेसचा उमेदवार कर्नम मारुबाई शंकर यांना १७५ मते मिळाली. तर ३५ मतदारांनी नोटाला मतदान केले. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी संघाच्या उमेदवार वेलादी सुशीला बहुमताने निवडून आल्या.रेगुंठा परिसरातील कोटापल्ली ग्रा.पं.च्या दोन जागांसाठी सोमवारी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात प्रभाग क्रमांक २ मधील रिक्त जागेवर आविसंच्या अट्टे सुजाता लक्ष्मण तर प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त जागेवर राकाँचे आत्राम किष्टय्या निवडून आले.कोर्ला माल व कोटापल्ली ग्रा.पं.ची पोट निवडणूक आविसंचे विदर्भ नेतृत्व व माजी आ.दीपक आत्राम व जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी लढविली होती. या निवडणुकीत आविसंचे उमेदवार निवडून आल्याने जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी आविसंचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर, पं.स.चे माजी उपसभापती आकुला मल्लिकार्जुनराव, आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविसं सल्लागार रवी सल्लम, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कुम्मरी सडवली, सूंकरेल्लीचे सरपंच समय्या चौधरी, मेडारामचे उपसरपंच ताल्ला वेंकन्ना, साईनाथ पटनाला, ग्रा.प.सदस्य सोमय्या गादे, दुर्गेश लंबाडी, सुरेश येरकरी, समय्या येदुरु, नरेश तेरकरी, बिरा आत्राम, गणपती वेलादी, सुरेश सडमेक, कुम्मरी रामय्या, सुरेश पागे, रवी सुल्तान, लक्ष्मण बोल्ले, नागेश सडमेक, कोडापे वेंकय्या, मधुकर सडमेक सडवली कोडापे, गोपाल सडमेक, रामुलु तलांडी, गड्डी दुर्गम, सांबय्या आलम, गोपाळ तोगर, नरेंद्र आलम, समय्या कोंडागोरला, गणपत आलम, प्रकाश आलम आदी उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.आरमोरी - आरमोरी तालुक्यातील सिर्सी ग्रामपंचायतीमधील सात जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत निकेश पेंदाम व हर्षाली भोयर यांनी विजय मिळविला. त्यापैकी चार उमेदवार हे अविरोध निवडून आले. ग्रामपंचायतमधील एक जागा रिक्त होती व वॉर्ड नं. १, वॉर्ड नं. २ मधील प्रत्येकी एका उमेदवाराची निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये वॉर्ड नं. १ मधील निकेश पेदाम यांना ३६२ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी संजय मडावी यांना १६१ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. संजय मडावी यांना २०१ मतावर समाधान मानावे लागले. वॉर्ड नं. २ मधील हर्षाली भोयर यांना ३६८ मते मिळाली तर रेखा नरूले यांना १२४ मते मिळाली. सिर्सी ग्रामपंचायत निवडणुकीत ३ पॅनल रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत भोलूभाऊ मित्र परिवार गटाचे दोन उमेदवार निवडून आले व इतर दोन गटाकडे प्रत्येकी चार उमेदवार आहेत. सरपंचपदासाठी चुरस वाढणार असून सरपंचपदी कोणत्या गटाचा व्यक्ती विराजमान होतो, याकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. उत्सुकताही वाढीस लागली आहे.नगरसेवकांवर कारवाईसाठी दाद मागणार; पत्रकार परिषदधानोरा नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमच्या दोन नगरसेवकांनी भाजपाला मतदान करून जनाधाराचा अनादर केला. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशिर कारवाईसाठी दाद मागण्यात येईल, अशी माहिती बरछा गटाने पत्रकार परिषदेत दिली. धानोरा नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने आमच्या (बरछा गट) नोंदणीकृत गटातील दोन नगरसेवकांना पळविले. रंजना प्रकाश सोनुले, नलिना बाजीराव गुरनुले यांनी जनतेचा विश्वासघात करून भाजपाला मतदान केले. त्यामुळे त्या वॉर्डातील महिलांनी त्यांच्या या कृत्याचा निषेध केला. नोंदणीकृत गटातील दोन नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशिर कार्यवाहीचा मार्ग आपण अवलंबणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला ललित बरछा, गणपत गुरनुले, मंगला मडावी, अर्चना लेनगुरे, विनोद मडावी, वंदना उंदीरवाडे, सदाशिव येरमे, राजू मोहुर्ले, माजी सरपंच माणिक मडावी, रवींद्र लेनगुरे, गिरीधर सोनुले, राजू रामपूरकर व नागरिक उपस्थित होते.