शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

ग्रामपंचायत निवडणुकीत जि.प. पदाधिकाऱ्यांचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 5:00 AM

जि.प.पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. हे पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सरसावले आहेत. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आदिवासी विद्यार्थी संघाचे आधारस्तंभ आहेत. पण वर्षभरापासून त्यांची काँग्रेस पक्षाशी जवळीकता वाढली. त्यामुळे दक्षिण भागात त्यांच्या रुपाने काँग्रेसला मजबूत सहकारी मिळाला आहे. याच भागात आ.धर्मरावबाबा यांनी वर्षभरापूर्वी बाजी मारल्याने राष्ट्रवादीची फळीही आहे.

ठळक मुद्देमतदार संघातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी कसली कंबर

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या १५ आणि २० जानेवारी अशा दोन टप्प्यात होऊ घातलेल्या ३६१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायतींशी सर्वाधिक जवळचा संबंध असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा यामुळे पणाला लागली आहे. आपापल्या क्षेत्रातील ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. जि.प.पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना वगळता सर्वच प्रमुख पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. हे पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सरसावले आहेत. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार आदिवासी विद्यार्थी संघाचे आधारस्तंभ आहेत. पण वर्षभरापासून त्यांची काँग्रेस पक्षाशी जवळीकता वाढली. त्यामुळे दक्षिण भागात त्यांच्या रुपाने काँग्रेसला मजबूत सहकारी मिळाला आहे. याच भागात आ.धर्मरावबाबा यांनी वर्षभरापूर्वी बाजी मारल्याने राष्ट्रवादीची फळीही आहे. गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आमदार अभिजीत वंजारी यांना घेऊन जिल्हा पिंजून काढत आहे.जि.प.अध्यक्षांचा आलापल्ली-वेलगूर गटअहेरी तालुक्यातील आलापल्ली-वेलगूर या जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या जि.प.गटात आलापल्ली, वेलगूर आणि किष्टापूर (वेल) या तीन ग्रामपंचायती आहेत. त्यात आविसं-काँग्रेसला फाईट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नात आहेत. पण या दोन प्रतिस्पर्ध्यांपुढे आता ग्रामसभा आपले उमेदवार उभे करून नवे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

समाजकल्याण सभापतींचा रेगडी गटजि.प.च्या समाजकल्याण सभापती रंजिता कोडाप यांच्या गटात १० ग्रामपंचायती आहेत. या भागाने भाजपला बरीच साथ दिली आहे. यावेळी काँग्रेसनेही बऱ्यापैकी कंबर कसून कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोणता पक्ष जास्त प्रभाव पाडतो याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.

उपाध्यक्षांच्या मुस्का गटात भाजपचे आव्हानधानोरा तालुक्यातील मुस्का या जि.प.चे गटाचे प्रतिनिधीत्व करत असलेले काँग्रेस नेते मनोहर पोरेटी यांच्या मतदार संघात तब्बल १६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १५ मध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. जनसंपर्कामुळे त्यांना मानणारा वर्ग त्या भागात असला तरी भाजप त्या गावांमध्ये आव्हान उभे करू शकतो.

कृषी सभापती आपली पकड कायम ठेवणार?चामोर्शी तालुक्यातील तळोधी-कुनघाडा या गटात भाजपचे सभापती प्रा.रमेश बारसागडे यांची बऱ्यापैकी पकड आहे. त्यांच्या गटातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होत आहे. त्यातील कुनघाडा, तळोधी, नवेगाव (रै), भाडभिडी, हिवरगाव या गावांमध्ये काँग्रेसही वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहे. 

महिला बालकल्याण सभापतींचा कुरूड गटदेसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरूडसह एकूण ६ ग्रामपंचायतींचा हा मतदार संघ सभापती रोशनी पारधी यांच्यासह सर्व राजकीय पक्षांसाठी महत्वपूर्ण मानला जातो. या भागात गेल्या काही वर्षात भाजपचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणणे त्यांच्यासाठी खूप कठीण वाटत नसले तरी काँग्रेसच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक