चामाेर्शी : अनुसूचित क्षेत्रांतर्गत येत असलेल्या २१ ग्रामपंचायतींपैकी गिलगाव, पावीमुरांडा, मुरमुरी, येडानूर, सगणापूर, साेनापूर, रेगडी, जयरामपूर, मुधाेली चक नं. २, कुनघाडा माल, भाडभिडी बी. या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे. चाैडमपल्ली, कुरूड, मक्केपल्ली माल, माराेडा, मुधाेली रिठ, कुथेगाव, माडेआमगाव माल, पेटतडा, ठाकरी, इल्लूर या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी राखीव आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेरील ५४ ग्रामपंचायती आहेत. यातील भाडभिडी माे., काेनसरी, रामाळा अनुसूचित जाती महिलासाठी राखीव झाले. फराडा व घाेट अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव आहेत. कळमगाव, विसापूर रै., मुरखळा चक अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आहेत. चाकलपेठ, वालसरा अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आहेत. अनखाेडा, भेंडाळा, दुर्गापूर, मक्केपल्ली चक नं. १, लखमापूर बाेरी, कान्हाेली, मार्कंडा कं. येथे नामाप्र महिलासाठी राखीव आहेत. वाकडी, मुरखळा माल, जामगिरी, विक्रमपूर, नवरगाव, माल्लेरमाल, चंदनखेडी या नामाप्र सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहेत. कुनघाडा रै. हळदवाही, फाेकुर्डी, तळाेधी माे., आष्टी, आमगाव म., हळदी माल, अड्याळ, वाघाेली, मार्कंडादेव, वेलतूर तुकूम, दाेटकुली, सिमुलतला, मुधाेली तुकूम, वसंतपूर या ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहेत. माेहुर्ली माे., गाैरीपूर, घारगाव, नवेगाव माल, सुभाषग्राम, साेमनपल्ली, वरूर, चापलवाडा, नवेगाव रै., नेताजी नगर, विकासपल्ली, बहाद्दूरपूर, वायगाव, गणपूर रै., कढाेली या ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर केले आहे.
एटापल्ली : तालुक्यातील कसनसूर, सेवारी, काेहका, येमली, ताेडसा, सरखेडा, जारावंडी, पुरसलगाेंदी, जवेली बु., गट्टा, वडसा खुर्द, हालेवारा, गेदा, मानेवारा, काेटमी, जांभिया या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव आहेत, तर गर्देवाडा, मेंढरी, दिंडवी, नागूलवाही, वागेझरी, कांदाेळी, जव्हेली खुर्द, तुमरगुंडा, साेहगाव, चाेखेवाडा, गुरुपल्ली, बुर्गी, घाेटसूर, वांगेतुरी, उडेरा या १५ ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहेत.
काेरची : काेरची तालुक्यातील नवेझरी, काेटरा, बाेदालदंड, सातपुती, बेलगाव, जांभळी, माेठाझेलिया, पिटेसूर, काेसमी नं. २, साेनपूर, टेमली, काेटगूल, मर्केकसा, आस्वलहुडकी, काेहका या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे. मुरकुटी, मसेली, बेतकाठी, बिहीटेकला, काेचीनारा, अल्लीटाेला, दवंडी, बाेरी, नवरगाव, नादंळी, बेडगाव, बाेबाटाेला, अरमुरकसा, नागपूर या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी राखीव आहे.
सिराेंचा : तालुक्यातील विठ्ठलरावपेठा, व्यंकटापूर, जानमपल्ली, अंकिसा माल, सुंकरअली, काेपेला, टेकडा माेटला, मादाराम, मादाराम रै., वडधम माल, नडीकुडा, नरसिंहापल्ली, गर्कापेठा, पेंटीपाका, आसरअल्ली, गुमलकाेंडा, सिरकाेंडा, काेर्ला माल, साेमनपल्ली, बेजूरपल्ली या ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. माेयाबिनपेठा, झिंगानूर, नारायणपूर, राजाराम, नगरम, लक्ष्मीदेवीपेठा रै., मद्दीकुंटा, पातागुडम, जाफ्राबाद चेक, तुमनूरमाल, परसेवाडा, रंगय्यापल्ली, मेडाराम माल, आदीमुक्तापूर, आरडा, गाेलागुडम माल, चिंतरवेला, रमेशगुडम, काेटापल्ली, पाेचमपल्ली या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव झाले आहे.
देसाईगंज : तालुक्यातील काेंढाळा, एकलपूर नामाप्र महिला, काेकडी नामाप्र सर्वसाधारण, किन्हाळा, कुरूड, विहीरगाव, काेरेगाव, शिवराजपूर अनुसूचित जमाती महिला, विसाेरा, तुळशी, चाेप सर्वसाधारण, आमगाव, बाेडधा, सावंगी सर्वसाधारण महिला, शंकरपूर अनुसूचित जाती, गांधीनगर अनुसूचित जाती महिला, कसारी तुकूम, पिंपळगाव, डाेंगरगाव, पाेटगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे.