शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ग्रामसेवकास सरपंचाकडून मारहाण

By admin | Published: March 12, 2017 1:55 AM

मोबाईल न दिल्याच्या कारणावरून भाडभिडीच्या ग्रामसेवकास तेथीलच सरपंचाने १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता मारहाण केली.

आरोपीला अटक व सुटका : मोबाईल न दिल्याच्या कारणावरून झाले भांडण; भाडभिडी ग्रामपंचायतीमधील घटना घोट : मोबाईल न दिल्याच्या कारणावरून भाडभिडीच्या ग्रामसेवकास तेथीलच सरपंचाने १० मार्च रोजी दुपारी १२ वाजता मारहाण केली. याबाबतची तक्रार ग्रामसेवकाने घोट पोलीस मदत केंद्रात दाखल केल्यानंतर सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. एकनाथ भुरसे सरपंच ग्रामपंचायत भाडभिडी असे अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. ग्रामसेवक वसंत मधुकर पवार हे ग्रामपंचायत कार्यालयात बसून प्रशासकीय कामे करीत होते. दरम्यान सरपंच एकनाथ भुरसे त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी ग्रामसेवकांचा मोबाईल मागितला. मात्र मोबाईलचा कव्हरेज नसल्याने ग्रामसेवकांनी मोबाईल देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान सरपंच भुरसे यांनी ग्रामसेवक पवार यांना शिविगाळ केली. मी तूला सोडणार नाही, असे म्हणून मारहाण केली व टेबलावरील कागदपत्रे, फाईल अस्ताव्यस्त फेकून दिल्या. याबाबतची तक्रार ग्रामसेवकाने घोट पोलीस मदत केंद्रात दाखल केली. त्यानुसार घोट पोलिसांनी सरपंच एकनाथ भुरसे यांच्या विरोधात ३५३, २२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर सरपंच भुरसे यांना अटक केली. भुरसे यांना शनिवारी आरमोरी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. या घटनेचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश जायभाये करीत आहेत. (वार्ताहर)