शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

वेतनवाढ मंजूर करून पगार निकाली काढा

By admin | Published: July 09, 2016 1:42 AM

पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून नव्याने रूजू झालेले डी. पी. सपाटे यांचा सोमवारी महाराष्ट्र राज्य ...

नवनियुक्त बीईओंना निवेदन : शिक्षक समितीची मागणी; डी. पी. सपाटे यांचा सत्कारधानोरा : पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून नव्याने रूजू झालेले डी. पी. सपाटे यांचा सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा धानोराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून वेतनवाढ मंजूर करून पगार निकाली काढण्याची मागणी केली.धानोरा येथील गटशिक्षणाधिकारी पांडुरंग कोल्हे यांचे स्थानांतरण झाल्याने त्यांच्या जागेवर डी. पी. सपाटे नव्याने रूजू झाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती शाखा धानोराच्या वतीने डी. पी. सपाटे यांची भेट घेऊन त्यांना निवडक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात, मासिक पगार वेळेत करावे, शिक्षण विभागातील रिक्त असलेले वरिष्ठ सहायक व कनिष्ठ सहायक लिपीक या विषयी निर्णय घेऊन तत्काळ पदस्थापना करावी, सेवापुस्तक अद्ययावत करून नोंदी घ्याव्या. जुलै महिन्याची वार्षिक वेतनवाढ मंजूर करून पगार काढावे, अप्रशिक्षित शिक्षकांची थकीत असलेली वार्षिक वेतनवाढ लावून वेतन वाढीच्या फरकाची रक्कम द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांशी विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सदर समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. त्यांनीही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे धानोरा तालुकाध्यक्ष डंबेश पेंदाम, सचिव अण्णा बावनथडे, सोमेश्वर दुगे, भावेश उईके, सचिन मेश्राम, नरेंद्र पेंदाम, प्रवीण सहारे, रवींद्र घोंगडे, दिलीप शेडमाके, हेमंत घोरापटिया, विलास दरडे, खुशाल भोयर, अमर पेंढारकर, राजेंद्र भजभुजे, प्रकाश नागापुरे, ओमप्रकाश सिडाम, प्रफुल सिडाम, अरूण सातपुते, नंदकिशोर नैताम, मोरेश्वर अंबादे, किशोर धाईत, हिराचंद वेलादी, किटे, रजनी कुमरे उपस्थित होत्या.