लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी/ भामरागड : अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात सीआरपीएफतर्फे व भामरागड येथे पोलीस ठाण्यातर्फे पोलीस शहीद दिवस कार्यक्रम २१ ऑक्टोबरला घेण्यात आला.अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने पोलीस शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रभारी कमांडंट रामरस मिना उपकमांडंट राजेंद्र सिंह, चिकित्सा अधिकारी संपतकुमार एम., रूपेश झाडे व कर्मचारी उपस्थित होते.२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे सीआरपीएफच्या तिसऱ्या वाहिनीतील एका कंपनीला भारत तिबेट सीमेवर तैनात करण्यात आले होते. जेव्हा २१ जवानांची लहान तुकडी हॉट स्प्रिंग येथे शोधमोहीम राबवित असताना चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. यात २१ जवानांपैकी १० जवान शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो, अशी माहिती२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे सीआरपीएफच्या तिसऱ्या वाहिनीतील एका कंपनीला भारत तिबेट सीमेवर तैनात करण्यात आले होते. जेव्हा २१ जवानांची लहान तुकडी हॉट स्प्रिंग येथे शोधमोहीम राबवित असताना चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. यात २१ जवानांपैकी १० जवान शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो, अशी माहिती, रामरस मिना यांनी दिली.भामरागड येथे पोलीस स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवने, पोलीस निरीक्षक संदीप भांड, पीएसआय व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. कुणाल सोनवने यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार पीएसआय ज्ञानेश्वर झोल यांनी केले.
शहीद जवानांना अभिवादन व श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 5:00 AM
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे सीआरपीएफच्या तिसऱ्या वाहिनीतील एका कंपनीला भारत तिबेट सीमेवर तैनात करण्यात आले होते. जेव्हा २१ जवानांची लहान तुकडी हॉट स्प्रिंग येथे शोधमोहीम राबवित असताना चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. यात २१ जवानांपैकी १० जवान शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो, अशी माहिती२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे सीआरपीएफच्या तिसऱ्या वाहिनीतील एका कंपनीला भारत तिबेट सीमेवर तैनात करण्यात आले होते.
ठळक मुद्देसीआरपीएफ व पोलिसांचा पुढाकार : अहेरी व भामरागडात कार्यक्रम