लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राजमाता जिजाऊ व युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम प्रशासनासह सामाजिक संघटना व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांतर्फे घेण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केले.जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली - जिल्हाधिकारी कार्यालयात १२ जानेवारी रोजी रविवारला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लेखाधिकारी सतीश धोतरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस तर जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रोखपाल वाय.पी.सोरते, विवेक दुधबळे, निमिश गेडाम, वासुदेव कोल्हटकर, रमेश मगरे, दादा सोरते, जे.एच.चांभारे, व्ही.एम.मोलगुरवार, व्ही.डी.उनगाटी, महादेव बसेना आदी कर्मचारी उपस्थित होते.कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालय, चामोर्शी - देवतळे महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व युवकाचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा कार्यक्रम संयुक्तरित्या घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.जी.म्हशाखेत्री होते. विशेष अतिथी म्हणून प्रा.डॉ.राजेंद्र झाडे, प्रा.डॉ.भूषण आंबेकर, प्रा.दीपक बाबनवाडे, प्रा.संजय म्हस्के, प्रा.मीनल गाजलवार, प्रा.शीतल बोमकंटीवार, प्रा.वर्षा टेप्पलवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.वंदना थुटे, संचालन अल्का वासेकर यांनी केले तर आभार हिमांशू धुरे यांनी मानले. यावेळी प्रा.दीपिका हटवार, प्रा.वैशाली कावळे यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्राचार्य डॉ.म्हशाखेत्री यांनी सदर महापुरूषांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याची सांगितले.श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय, आष्टी - कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण होते. मार्गदर्शक म्हणून डॉ.एन.पी.सिंग तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अपर्णा मारगोनवार, डॉ.पी.के.सिंग, डॉ.प्रदीप कश्यप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सिलमवार, संचालन प्रा.प्रकाश राठोड यांनी केले तर आभार विजय खोब्रागडे यांनी मानले. डॉ.दीपक नागापुरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी प्राध्यापकांनी सहकार्य केले.विद्याभारती कन्या हायस्कूल, गडचिरोली - येथे दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गो.ना.मुनघाटे, स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.जी.कुंभरे होते. प्रमुख अतिथी म्हणून वंदना मुनघाटे, पर्यवेक्षिका मंगला चौधरी हजर होते. यावेळी गो.ना.मुनघाटे तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.संजीवनी विद्यालय, नवेगाव - स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत संजीवनी विद्यालयाचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी विवेक गजपुरे याने तृतीय क्रमांक पटकाविला. समूहनृत्य स्पर्धेत मुलीच्या चमूने प्रथम क्रमांक पटकाविला.सिरोंचात संघाचा तालुका एकत्रिकरण, पथसंचलनस्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा सिरोंचाच्या वतीने येथील श्री विठ्ठलेश्वर मंदिर परिसरात सिरोंचा तालुका एकत्रिकरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा संघ चालक रामन्ना तोटावार, तालुका संघ चालक शंकरराव बुद्धावार, तालुका कार्यवाह चंद्रशेखर माणिक रौतू यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.आनंद भोयर उपस्थित होते. दुपारी १२ वाजता विठ्ठलेश्वर मंदिर परिसरात एकत्रित येऊन पटांगणावर भगवा ध्वज फडकविण्यात आला. ध्वजवंदन करून सांघिक व्यायाम व योग करण्यात आला. त्यानंतर पथसंचलन करण्यात आले. मंदिर पटांगणापासून शहराच्या मुख्य मार्गाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन करून पुन्हा कार्यक्रमस्थळी एकत्रिकरण झाले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ असा जयघोष पथसंचालनात करण्यात आला. शिवाय सांघिक गीत सादर करण्यात आले. याप्रसंगी स्वामी विवेकानंदांचे कार्य व विदेशातील शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेबाबतची माहिती उपस्थित मान्यवरांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला सिरोंचा शहरासह अंकिसा, असरअल्ली, जानमपल्ली, मद्दिकुंठा, पेंटीपाका, रंगय्यापल्ली आदी गावातील संघ स्वयंसेवक उपस्थित होते. युवकांनी स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करून संघर्षमय जिवन जगावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी तोटावार व रणजीत गागापुरपू यांनी केले.
जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 6:00 AM
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली - जिल्हाधिकारी कार्यालयात १२ जानेवारी रोजी रविवारला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लेखाधिकारी सतीश धोतरे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस तर जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ठळक मुद्देजयंती उत्साहात साजरी : प्रशासन, सामाजिक संघटना व महाविद्यालयातर्फे कार्यक्रम