लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : जिल्ह्याला मिळालेल्या नैसर्गिक वरदानामुळे बहुतांश भागात मध्यम, चांगल्या निचºयाची, भुसभुसीत, वाळू मिश्रीत माती असल्याने काळाच्या ओघात महत्त्वाचे ठरणारे भूईमुगाच्या पिकात वाढ झाली असून यंदा जिल्ह्यात भूईमुगाचा पेरा वाढला आहे. विशेष म्हणजे आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यात सुमारे ७०० हेक्टरवर भूईमुगाचे पीक शेतकरी घेत आहेत.कुरखेडा तालुक्यात वाहणाºया खोब्रागडी, सती, वैलोचना नदीचा किनारा व आरमोरी तालुक्यातील गाढवी नदीच्या किनाºयावर आॅक्टोबर महिन्याच्या प्रारंभापासून भूईमुग पिकाची लागवड सुरू केली जाते. जिल्ह्यातील धानोरा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली तालुक्यातील शेतकरी नगदी उत्पन्न देणाºया भूईमूग पिकाकडे वळले आहेत. आरमोरी तालुका कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आरमोरी तालुक्यात सन २०१० पर्यंत केवळ बोटावर मोजण्याइतके शेतकरी भूईमुगाचे पीक घेत होते. पण गेल्या पाच-सात वर्षांत भूईमुग पीक घेणाºया शेतकºयांची संख्या वाढली आहे. एकट्या आरमोरी तालुक्यात २०० हेक्टर क्षेत्रात भूईमुगाचे पीक घेतले जात आहे.भूईमुग हे तेलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक असून काळाच्या ओघात या पिकाचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. बाजारातही भूईमुगाची मागणी वाढली आहे. सदर पिकात निरनिराळ्या हवामानाला जुळवून घेण्याची क्षमता असल्याने खरीप हंगामातील धानपीक निघाल्यानंतर रब्बी हंगामातील भूईमुग पीक सहजतेने येऊ शकते. आरमोरी तालुक्यातील अनेक शेतकºयांनी भूईमूग पिकाच्या भरवश्यावर आपली आर्थिक परिस्थिती मजबूत केल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात भुईमुगाचा पेरा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:56 AM
जिल्ह्याला मिळालेल्या नैसर्गिक वरदानामुळे बहुतांश भागात मध्यम, चांगल्या निचºयाची, भुसभुसीत, वाळू मिश्रीत माती असल्याने काळाच्या ओघात महत्त्वाचे ठरणारे भूईमुगाच्या पिकात वाढ झाली...
ठळक मुद्देनगदी पीक : आरमोरी, कुरखेडा, धानोरा तालुक्यात ७०० हेक्टरवर लागवड