सभेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गुलाबसिंग राठोड, केंद्रप्रमुख नीलकंठ साखरे, विषय साधन व्यक्ती गणेश बिसेन, किसान विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण तुंबडे, शिवानी विद्यालयाचे सचिन उंदीरवाडे, तसेच केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी कोकुडे यांनी इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थी व प्रत्यक्ष शाळेत दाखल विद्यार्थी, विद्यार्थी प्रमोशन, शिक्षक लसीकरण, विद्यार्थी आधारकार्ड अपडेट आदींचा आढावा घेतला. याशिवाय शिक्षक राबवित असलेले उपक्रम, अभ्यासमाला, शाळा बाहेरची शाळा याविषयी शिक्षकांशी चर्चा केली. ब्रिज कोर्स उपक्रमाबद्दल त्यांनी माहिती घेतली. दरम्यान, शिक्षकांनी ब्रिज कोर्स राबवित असताना येणाऱ्या अडचणी, तसेच शाळा सुरू करण्याबाबत येणाऱ्या अडचणी सांगितल्या. त्यावर गटशिक्षणाधिकारी कोकुडे यांनी शिक्षकांसोबत चर्चा करून शिक्षकांना त्यातून कसा मार्ग काढता येईल, याबाबत सांगितले. प्रास्ताविक केंद्रप्रमुख नीलकंठ साखरे, संचालन सुवर्णनगरचे शिक्षक पुंडलिक देशमुख, तर आभार केवळराम राऊत यांनी मानले.
100721\4350img-20210710-wa0045.jpg
शिक्षक आढावा सभेत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी नरेंद कोकुडे