शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

पीक विम्याच्या हप्त्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 11:33 PM

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्यासाठी दरवर्षी काढल्या जाणाऱ्या पीक विम्याच्या हप्त्यात यावर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यात धानाच्या पिकासाठी गेल्यावर्षीपेक्षा हेक्टरी ७८ रुपये, सोयाबीनसाठी १८ रुपये तर कापसाच्या पिकासाठी सर्वाधिक ४६९ रुपये हेक्टरी वाढ करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकापसासाठी सर्वाधिक । गेल्यावर्षी धान उत्पादक विम्याच्या लाभासाठी ठरले अपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्यासाठी दरवर्षी काढल्या जाणाऱ्या पीक विम्याच्या हप्त्यात यावर्षी वाढ करण्यात आली आहे. त्यात धानाच्या पिकासाठी गेल्यावर्षीपेक्षा हेक्टरी ७८ रुपये, सोयाबीनसाठी १८ रुपये तर कापसाच्या पिकासाठी सर्वाधिक ४६९ रुपये हेक्टरी वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी धान उत्पादन चांगले झाल्याने विमा कंपनीकडून कोणालाही नुकसानभरपाई मिळाली नाही. मात्र १२९ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ७ लाख ७२ हजारांचा लाभ मिळाला होता.यावर्षी पर्जन्यमानाची स्थिती पाहता पिक चांगले येईलच याची शाश्वती राहिलेली नाही. खरीप हंगामासाठी आवश्यक पाऊस अजूनही जिल्ह्यात झालेला नाही. अशा स्थितीत सर्व शेतकºयांनी २४ जुलैपूर्वी पीक विमा काढावा, अशी सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे.जिल्हयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरीता शासनामार्फत अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लिमिटेड, मुंबई या विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्यावर्षी धान पीकासाठी विम्याचा हप्ता हेक्टरी ५९७.५० रुपये होता. यावर्षी तो ६७५ रुपये असा झाला आहे. कापसासाठी गेल्यावर्षी १६८१.२५ रुपये असा हप्ता होता. तो यावर्षी २१५० रुपयांवर गेला आहे. सोयाबीनचा हप्ता ६४७.५० वरून ६६५ रुपये झाला आहे. या रकमेतून ७० टक्के जोखीम स्तर लागू राहणार आहे. जिल्ह्यात धान हे मुख्य पीक असले तरी दक्षिण भागात कापसाचे प्रमाण वाढले आहे. कमी पर्जन्यमानामुळे उद्भवलेल्या प्रतिकुल परिस्थितीत पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे भविष्यात शेतकºयांचे नुकसान होऊ शकते. जिल्ह्यात भात पिकाचा विमा उतरवण्यासाठी सर्व महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत. मात्र सोयाबिन पिकाकरीता अहेरी, पेरमिली, आलापल्ली, जिमलगट्टा, मुलेचरा, बामणी तर कापूस पिकाकरीता अहेरी, आलापल्ली, जिमलगटा, सिरोंचा, बामणी, पेंटीपाका, असरअल्ली या महसुल मंडळातील शेतकरी पात्र ठरणार आहेत.कृषी कर्ज घेणाऱ्यांना विमा अनिवार्यशेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढावा अशी प्रशासनाची भूमिका असली तरी तो काढावा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे. मात्र कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. कर्जासाठी अर्ज करतानाच विम्याचा अर्ज भरून घेऊन विम्याचा हप्ता कापला जात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.या बाबींवरून निश्चित करतात नुकसानभरपाईविमा संरक्षणाच्या बाबींमध्ये पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व /लावणीपूर्व झालेले नुकसान, हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक नैसिर्गक आपत्ती इ.चा समावेश होतो. खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा व फळपिक योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडावा. त्याचप्रमाणे बिगर कर्जदार शेतक-यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्याचा क्रमांक अर्जावर नमुद करावा लागणार आहे. गावपातळीवर आपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्र) शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज भरण्याकरीता उपलब्ध करण्यात आले आहेत. या योजनेच्या माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करून २४ जुलैपूर्वी अर्ज भरावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती