लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते शनिवारी ३१ मार्च रोजी करण्यात आले.या कार्यक्रमाला पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, अहेरी नगर पंचायतीच्या अध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, हेमंत राठी, किसन नागदेवे, रवींद्र करपे, सोमेश्वर धकाते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चामोर्शी मार्गावरील जिल्हा परिषद शाळेसमोर अॅड. धाईत बिल्डींगमध्ये पालकमंत्री आत्राम यांच्या कार्यालयाचा गुरूवारपासून शुभारंभ करण्यात आला. या कार्यालयाच्या माध्यमातून पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात जनसंपर्क वाढविण्यावर भर देणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.या कार्यक्रमादरम्यान चामोर्शी मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. रस्त्याच्या एका बाजुला वाहनाची रांग लागली होती.
पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:59 IST
राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ट वाहतूक, जहाजबांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते
पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ
ठळक मुद्देजनसंपर्क वाढविण्यावर देणार भर : नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन