गुड्डीगुडम परिसरातील नागरिकांना शैक्षणिक समस्या, नेटवर्क समस्या, रोड, नाल्या ईत्यादी समस्यांचा सामना करावा लागत आहे. निराकरण करण्यास मात्र ग्रामपंचायत प्रशासन फोल ठरत आहे.
नळाची जोडणी गावात देण्यात आली. मात्र नळ बसवल्या ठिकाणी प्लॅटफॉर्म केले नसल्याने पूर्ण पाइप लाइन तोडफोड होऊन गेले आहेत. त्वरीत नळ योजनेचे उद्घाटन करून लोकार्पण सोहळा पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
आत्ता नळ जोडणीसाठी टाकलेले पाइप लाइन पूर्णतः नायनाट झाले आहेत. नळ पाणीपुरवठा योजना सुरू होण्यापूर्वीच पुन्हा दुरुस्ती करावी लागते की काय अशी शंका या परिसरात चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणूक झाले आहे. व आता नवीन सत्ता व नवनियुक्त सरपंच व सदस्य विराजमान झाले आहेत. आता तरी नळ पाणीपुरवठा योजना सुरू होईल या आशेवर नागरिक मोठय़ा उत्सुकतेने वाट पाहत आहेत.