ऑनलाईन लोकमतगडचिरोली : शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम तयार करताना आयएएस अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. लोकांच्या गरजेनुसार आरोग्य संसद, दारूमुक्तीची लोकचळवळ व इतर उपक्रम राबविले पाहिजे, असे आवाहन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.उत्तराखंडच्या मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनपर भाषणाचे आयोजन २२ मार्च रोजी करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.ग्रामीण आणि आदिवासी समाजाच्या सामुदायिक सहभागातून सर्च(शोधग्राम) संस्थेच्या माध्यमातून गडचिरोली येथे राबविलेल्या उपक्रमांची माहिती सांगतानाच आयएएस अधिकाºयांच्या शिक्षणासाठी याचा कसा उपयोग होईल याविषयी त्यांनी माहिती दिली. लोकांच्या आरोग्याच्या गरजा काय आहेत, त्यांना विश्वासात घेऊन त्या कशा ओळखाव्या यासाठी सर्च(शोधग्राम) द्वारे सुरु करण्यात आलेल्या ‘आरोग्य संसद’ या कार्यक्रमाची माहिती त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिली. ‘आरोग्यदूत’ या नावाने गावातील व्यक्तीला आरोग्य कार्यकर्ता म्हणून प्रशिक्षित करून गावांमध्ये आरोग्यसेवा आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी सर्चने सुरु केलेल्या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली. दारू व तंबाखूचे व्यसन ही ग्रामीण भागात मोठी समस्या आहे. गडचिरोली जिल्ह्यातही ही समस्या मोठ्या प्रमाणावर होती. पण लोकचळवळीतून गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखूमुक्त व्हावा यासाठी १९८८ पासून प्रयत्न सुरु केले. त्यामुळे जिल्ह्यात १९९३ साली दारूबंदी झाल्याचे डॉ. बंग यांनी यावेळी सांगितले. आता मुक्तिपथ या नावाने जिल्हाव्यापी अभियान सुरु आहे. यांतर्गत ६७ गावे दारू व तंबाखूमुक्त झाली असून ६४१ गावांनी दारूविक्री बंदीचा ठराव घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आयएएस प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:42 PM
शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम तयार करताना आयएएस अधिकाऱ्यांनी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. लोकांच्या गरजेनुसार आरोग्य संसद, ....
ठळक मुद्देअभय बंग यांचे आवाहन : लोकांच्या गरजेनुसार उपक्रम राबवा