लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली व कृषी तंत्रज्ञान (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २ मे रोजी बुधवारी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील सभागृहात किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून उपविभागीय कृषी अधिकारी तथा आत्माच्या प्रकल्प उपसंचालक प्रिती हिरळकर यांनी विविध विभागाच्या समन्वयातून योजना राबवून त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे आवाहन केले. उद्घाटनीय भाषणातून प्रगतशील शेतकरी प्रतिभा चौधरी यांनी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रा. योगीता सानप यांनी कीटकनाशके फवारणी करताना कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. दहीकर यांनी बँकेमार्फत पीक कर्ज दिला जातो. त्याचबरोबर पीक विमा काढल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो असे मार्गदर्शन केले. डॉ. किरण वाघमारे यांनी मत्स्यबीज व मत्स्य विभागाच्या योजनांची माहिती दिली. राजेश वाणी यांनी सेंद्रीय शेतीबाबत तर डॉ. देवेंद्र मुनघाटे यांनी शेतीबाबत विचार व्यक्त केले.या कार्यक्रमात प्रतिभा चौधरी, राजेश वाणी, डॉ. देवेंद्र मुनघाटे, अनुरथ निलेकार, बंडू तोडासे व राजेश वजीर मेश्राम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संचालन सावेलाचे कृषी सहायक सुनिल बुद्धे तर आभार जे. एच. जिरीतकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी एन. जी. बडवाईक, कृषी पर्यवेक्षक एम. जे. दिहारे, एस. पी. पोटे, एन. एन. बाबनवाडे, जी. एल. भेंडारे, एस. डी. रामटेके, के. पी. सातार, चौधरी, हेमके, आलेवार, शंभरकर, दौरेवार यांनी सहकार्य केले.
दुप्पट उत्पादनासाठी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:59 AM
तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली व कृषी तंत्रज्ञान (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने २ मे रोजी बुधवारी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथील सभागृहात किसान कल्याण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्देकिसान कार्यशाळा : आत्मा व गडचिरोली तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा उपक्रम