ेगडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली शहरातील २० सिव्हील कंत्राटदार व ३९ ग्राप्समन यांना कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य के. एस. विसाळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तांत्रिक अधिकारी चित्तरंजन कापगते होते. कार्यशाळेदरम्यान कापगते यांनी पॉवर पार्इंट प्रेझेंटनशनद्वारा सिमेंट निर्मिती प्रक्रिया, प्रापर्टी, प्रकार व उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली. कन्ट्रक्शन साईडवर सिमेंट टेस्टबाबतचीही माहिती देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य विसाळे म्हणाले की, अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे कामाची गती व कुशलता वाढण्यास मदत होते. आत्मविश्वास वाढीसही मदत होते. बांधकाम क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. भारतात बांधकाम क्षेत्रात फारमोठी उलाढाल व गुंतवणूक होत आहे. कंत्राटदारांनी स्वत:चे कौशल्य वाढविण्याची गरज असल्याचे मार्गदर्शन केले. संचालन भास्कर मेश्राम तर आभार मंजूषा गव्हारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अब्दुल रहमान, हिमेश्वरी कवाडकर यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
कंत्राटदारांना बांधकामाचे मार्गदर्शन
By admin | Published: March 15, 2017 2:01 AM