काेराेना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर शासनाने बस प्रवासाला परवानगी दिली. विशेष म्हणजे पूर्ण क्षमतेनिशी बस साेडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, ग्रामीण भागातील बसेसला अजूनही पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने या भागातील फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ मुख्य मार्गावरच्या बसफेऱ्या सुरू आहेत.
काेराेनापूर्वी जिल्ह्यात दिवसाला ५४६ फेऱ्या साेडल्या जात हाेत्या. आता केवळ १४० फेऱ्या साेडल्या जात आहेत. जवळपास निम्मेच चालक, वाहक कामावर बाेलविले जात आहेत.
बाॅक्स....
मानव विकास मिशनच्या बसेस उभ्या
मानव विकास मिशनच्या बसेस शालेय विद्यार्थ्यांसाठी साेडल्या जातात. शाळा बंद असताना जिल्ह्यातच चालविण्याची परवानगी आहे. लांब प्रवासावर या बसेस साेडता येत नाहीत. त्यामुळे मानव विकास मिशनच्या बसेस आगारातच आहेत. अनेक मार्गांवरील बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.
बाॅक्स...
प्रवाशांना खासगी गाड्यांचा आधार
ग्रामीण भागातील बसफेऱ्या जवळपास बंदच असल्याने नागरिकांना ॲटाे, टॅक्सी यासारख्या खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. काेराेनाच्या संकटात अनेकांनी दुचाकी, चारचाकी वाहने घेतली आहेत. त्यामुळे बसची आता गरज राहिली नाही.
बाॅक्स...
प्रवासी काय म्हणतात...
धानाेरा मार्गावर पूर्वीच्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. त्यामुळे खासगी टॅक्सीने जावे लागत आहे. बसलाही प्रवासी मिळत नाही. त्यामुळे बसफेऱ्यांची संख्या कमी असावी.
- शिवराम दाेडके, प्रवासी
..............
बसमध्ये काही नागरिक मास्क घालत नाहीत. बसमध्ये चढताना वाहक प्रत्येक प्रवाशाला मास्क घालण्याची सूचना करतात. काहीवेळापुरता प्रवासी मास्क घालतात. त्यानंतर काढून ठेवतात. त्यामुळे एसटी प्रवास करणे धाेकादायक वाटते. मात्र, काही पर्याय नसल्याने प्रवास करावा लागते.
- सुखदेव नैताम, प्रवासी
बाॅक्स...
एकूण बसेस - १०३
सध्या सुरू असलेल्या बसेस - ५४
आगारात असलेल्या - ४९
एकूण कर्मचारी - ४३१
एकूण चालक - २०४
एकूण वाहक - १७७
सध्या कामावर चालक - ७५
सध्या कामावर वाहक - ७५