शेकडो नागरिक परतले : नोटाबंदीच्या सहा महिन्यानंतरही स्थिती मजबूत नाहीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली शहरासह आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागातील निम्म्या एटीएममध्ये रोकड उपलब्ध राहत नसल्याने नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. नोटबंदीच्या सहा महिन्यानंतरही एटीएमची स्थिती पूर्णत: मजबूत झाली नसल्याचे यावरून दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, कॅनरा बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, ग्रामीण बँक आदी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांचे मोठ्या प्रमाणात एटीएम आहेत. या एटीएममध्ये बँक व्यवस्थानाकडून रोकड टाकली जाते. मात्र सदर रोकड ही पुरेशी नसल्याने केवळ पाच ते सहा तासातच रोकड संपते. त्यानंतर एटीएममध्ये रोकड टाकण्याची तसदी बँक व्यवस्थापनाकडून घेतली जात नाही. त्यामुळे आठ ते दहा तासापेक्षा अधिक वेळ बऱ्याच एटीममध्ये रोकड उपलब्ध राहत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना बँकिंग सेवेशी जोडण्यासाठी तसेच कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी एटीएमची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र अनेक एटीममध्ये रोकड उपलब्ध राहत नसल्याने अनेक एटीएम निरूपयोगी ठरले आहेत. अनेक एटीएमच्या प्रवेशद्वारासमोर ‘नो कॅश’चे फलक झळकत असल्याचे दिसून येत आहे. लिंक फेलमुळे बँकांचे आॅनलाईन व्यवहार ठप्प१२ जून रोजी सोमवारला सकाळपासूनच इंटरनेटची लिंक फेल असल्याने गडचिरोली, धानोरासह सर्वच तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे आॅनलाईन व्यवहार ठप्प पडले होते. लिंक फेलमुळे रोकड असूनही काही एटीएम काम करीत नव्हते. सोमवारी गडचिरोली शहरातील एक्सीस बँक वगळता इतर साऱ्या बँकेचे एटीएम दुपारनंतर बंद होते. अनेक एटीएममध्ये रोकडचा तुटवडाही निर्माण झाला होता. परिणामी एटीएमच्या प्रवेशद्वारावर ‘नो कॅश’चे फलक झळकत होते. रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी गडचिरोली शहरातील बहुतांश एटीएम कॅशलेस राहतात. सोमवारी अनेक एटीएम बंद असल्याने पावसात ग्राहकांना एक्सीस बँकेच्या एटीएमकडे ऐनवेळी धाव घ्यावी लागली.
जिल्ह्यातील निम्मे एटीएम कॅशलेस
By admin | Published: June 13, 2017 12:43 AM